WPL 2023 RCB vs UPW Match Updates: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा १३ वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. आरसीबीची कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी यूपी वॉरियर्सला आमंत्रित केले होते. यूपी वॉरियर्सने ग्रेस हॅरिस आणि दीप्ती शर्माच्या शानदार भागीदारी जोरावर आरसीबीला १३६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

यूपी वॉरियर्सची सुरुवात खराब झाली –

यूपी वॉरियर्सची सामन्याची सुरुवात खूपच खराब झाली. त्याने पहिल्या दोन षटकांत तीन विकेट गमावल्या. देविका वैद्य आणि अॅलिसा हिली पहिल्याच षटकात बाद झाल्या. डावाच्या दुसऱ्या चेंडूवर सोफी डिव्हाईनने देविकाला एलबीडब्ल्यू केले. तिला खाते उघडता आले नाही. सहाव्या चेंडूवर डेव्हाईनने एलिसा हिलीला आशा शोबानाकडे झेलबाद केले.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Highlights Match in Marathi
LSG vs CSK Highlights, IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय, राहुल-डी कॉकने झळकावले अर्धशतक
Ravindra Jadeja Teases chepauk Crowd by Going For Batting Before MS Dhoni
IPL 2024: चेपॉकच्या मैदानावर जडेजाने घेतली चाहत्यांची फिरकी, धोनी आधी फलंदाजीला उतरला अन्… VIDEO होतोय व्हायरल
RCB vs LSG Match Updates in Marathi
IPL 2024 : क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या जोरावरने लखनऊने उभारला धावांचा डोंगर, आरसीबीसमोर ठेवले तब्बल ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य
KKR beat RCB in IPL 2024
RCB vs KKR : कोलकाताचा बंगळुरूमध्ये विजयी विक्रम कायम, केकेआरकडून आरसीबीचा ७ गडी राखून पराभव

हीलीला तीन चेंडूत केवळ एक धाव करता आली. मेगन शुटने डिव्हाईन नंतर कहर केला. तिने डावातील पहिल्या आणि दुसऱ्या षटकात आरसीबीला तिसरे यश मिळवून दिले. शुटने ताहलिया मॅकग्राला यष्टिरक्षक रिचा घोषकडे झेलबाद केले. मॅकग्राला दोन चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या.

यूपी वॉरियर्स संघाकडून ग्रेस हॅरिसने सर्वाधिक धावा केल्या. तिने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार लगावत ४६ धावांची खेळी केली. परंतु अवघ्या ४ धावांनी तिचे अर्धशतक हुकले. त्याचबरोबर किर नवगिरे आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २२-२२ धावांचे योगदान दिले. त्यामुळे यूपी वॉरियर्स १२० धावांचा टप्पा पार करता आला. ग्रेस आणि दीप्तीने केलेल्या ६९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर यूपी वॉरियर्सने १९.३ षटकांत सर्वबाद १३५ धावा केल्या.

हेही वाचा – IPL 2023: आरसीबी संघाला मोठा धक्का! १४० षटकार लगावणारा खेळाडू आयपीएलमधून बाहेर

आरसीबी संघाकडून गोलंदाजी करताना एलिस पेरीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने चार षटकांत १६ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अशा शोभना आणि सोफी डिव्हाईनने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तसेच मेगन शुटने एक विकेट घेतली.