What is the highest successful Test chase at Lord’s: जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचा (WTC) अंतिम सामना दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जात आहे. या फायनलमध्ये दोन्ही संघांनी अटीतटीची लढत देताना पाहायला मिळत आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात सर्वबाद झाला. यासह दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचे मोठे आव्हान दिले आहे. यासह लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावर सर्वात यशस्वी धावसंख्येचा पाठलाग कोणत्या संघांनी केला आहे, जाणून घेऊया.
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी २८२ धावांचे आव्हान दिले आहे. अंतिम सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांत २८ विकेट्स पडल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २५० धावांच्या पुढे आपली आघाडी वाढवली. ९ व्या क्रमांकावर असलेल्या मिचेल स्टार्कने जोश हेझलवूडसह ५९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. तर स्टार्कने कमालीची फलंदाजी करत ११वे कसोटी अर्धशतक झळकावत दक्षिण आफ्रिकेसमोर कठीण आव्हान उभे केले.
लंडनमधील कसोटी सामन्यात २५० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग फक्त तीन वेळाच झाला आहे. दक्षिण आफ्रिकेला आयसीसीचे जेतेपद जिंकण्यासाठी लॉर्ड्सवर त्यांना कसोटीमधील सर्वोच्च धावसंख्या गाठावी लागणार आहे. १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्ध गॉर्डन ग्रीनिजच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने ३४२ धावांचा जबरदस्त पाठलाग केला होता, जो अजूनही अव्वल स्थानावर आहे.
पुढील तीन २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग यजमान संघ इंग्लंड आणि न्यूझीलंडने केला आहे. ज्यामध्ये १९६५, २००४ आणि २०२२ मध्ये इंग्लिश संघाने तिन्ही वेळा विजय मिळवला आहे. २०२२ मध्ये इंग्लंड क्रिकेटमध्ये ‘बॅझबॉल’ युगाला प्रारंभ झाला असताना यजमान संघाने बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील पहिल्या कसोटीत ७८.५ षटकांत २७७ धावांचे लक्ष्य पूर्ण केले.
लॉर्ड्सवर विजयी लक्ष्य गाठणारे संघ आणि धावसंख्या
३४४/१, वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, १९८४
२८२/३, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, २००४
२७९/५, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, २०२२
२१८/३, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, १९६५
धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा विक्रम कसा आहे?
दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्या ५ बाद २८३ आहे. दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००८ मध्ये पर्थमध्ये ४१८ धावांचा विक्रमी पाठलाग केला होता, जी आतापर्यंतची दुसरा सर्वोच्च धावसंख्या आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध धावांचा सर्वात यशस्वी पाठलाग होता. दक्षिण आफ्रिकेचा धावांचा पाठलाग करतानाचे इतर २ विक्रमही ऑस्ट्रेलियाविरूद्ध आहेत. जे त्यांनी अनुक्रमे २००२ आणि १९५२ मध्ये किंग्जमीड आणि मेलबर्न येथे केले आहेत.
दक्षिण आफ्रिकेची कसोटीमधील धावांचा पाठलाग करताना सर्वात यशस्वी धावसंख्या
दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया, वाका ग्राऊंड, ४१४ धावांचं लक्ष्य
दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया, किंग्समीड, ३३५ धावांचं लक्ष्य
दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया, एमसीजी, २९७ धावांचं लक्ष्य
दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड, ओल्ड वांडरर्स, २८७ धावांचं लक्ष्य