Yashasvi Jaiswal Run Out Reaction video: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटीत भारताच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून दुसऱ्या कसोटीत यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी करत शतकी खेळी केली आणि भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. आपल्या द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेला हा युवा फलंदाज विचित्र पद्धतीने रनआऊट झाला.
पहिल्या दिवशी भारतीय संघाने २ बाद ३१८ धावा केल्या. यादरम्यान यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांनी १८० अधिक धावांची उत्कृष्ट भागीदारी रचली. तर सुदर्शन ८७ धावांवर बाद होत माघारी परतल्याने त्याचं शतक हुकलं. गिल आणि जैस्वालनेही अर्धशतकी भागीदारी रचली. याशिवाय यशस्वी १७३ धावा तर गिल २० धावांवर नाबाद परतले. पण दुसऱ्या दिवशी फक्त २ धावा करत यशस्वी जैस्वाल धावबाद झाला.
यशस्वी जैस्वालने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेत झाला झेलबाद
यशस्वी जैस्वाल दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर दुसऱ्या षटकात मोठी चूक करून बसला. जैस्वालने सील्सच्या दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जैस्वालने मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला आणि चेंडू खेळताच जैस्वाल धाव घेण्यासाठी धावला. पण चेंडू मिड विकेटच्या फिल्डरने गोळा केला होता, गिलने हे पाहताच धाव घेण्यास नकार दिला, तोपर्यंत जैस्वाल निम्मा क्रीजचा भाग पार करून गेला होता. जैस्वालने फिल्डरच्या हाती चेंडू पाहत जोरात मागे पळाला पण तोपर्यंत यष्टीरक्षकाने त्रिफळा उडवला होता.
जैस्वालने धावबाद झालेलं पाहताच आपल्या कपाळावर हात मारून घेतला. तर शुबमन गिलही चकित झालेला पाहायला मिळाला. “हा माझा कॉल होता” म्हणत त्यावर धावबाद झाल्याच्या वैतागलेल्या अवस्थेत गिलबरोबर चर्चा करताना दिसला. अखेरीस जैस्वाल धावबाद असल्याचे स्पष्ट असल्याने निराश होत तो माघारी परतला. जैस्वालने या खेळीत २५८ चेंडूत २२ चौकारांसह १७५ धावांची शानदार खेळी केली, पण त्याचं द्विशतक मात्र हुकलं.