scorecardresearch

IND vs AUS: “तुमच्या सर्वोत्तम खेळाडूंना संधी देणे…” अनिल कुंबळेने सूर्यकुमारच्या आधी जडेजाला पाठवण्याबाबत केले सूचक विधान

IND vs AUS Final 2023: अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्डकप फायनलमध्ये सूर्यकुमार यादवच्या आधी रवींद्र जडेजाला पाठवण्याचा निर्णयावर मोठे वक्तव्य केले आहे.

He is a better batsman Former cricketer Anil Kumble gave a statement on sending Jadeja before Suryakumar
माजी गोलंदाज अनिल कुंबळेने कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. सौजन्य- (ट्वीटर)

India vs Australia World Cup Final 2023: विश्वचषक २०२३मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारतीय फलंदाजीची धावसंख्या १४८/४ अवघड परिस्थितीत असताना रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी आला होता. या अष्टपैलू खेळाडूला या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या पुढे पाठवण्यात आले. माजी गोलंदाज अनिल कुंबळेने कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

रवींद्र जडेजा भारतीय डावाच्या २९व्या षटकात केवळ ९ धावा काढून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव याला मैदानात उतरवण्यात आले. मात्र, शेवटी मोठी धावसंख्या उभारण्यात तोही अपयशी ठरला. कर्णधाराच्या या निर्णयावर अनिल कुंबळेने ईएसपीएन क्रिकइन्फोवरील संभाषणात म्हटले, “तुम्हाला काळजी वाटत आहे की सूर्यकुमार यादव बाहेर पडला तर काय होईल? जेव्हा तुम्ही मोठे ध्येय ठेवता तेव्हा तुम्हाला त्या परिस्थितीत घडणाऱ्या घटनांचा विचार करण्याची गरज असते. सध्या सामन्यात काय घडत आहे हे महत्त्वाचे होते, तरीही तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम खेळाडूंना संधी देणे आवश्यक वाटले नाही, हे फक्त भारतचं करू शकतो.

England vs New Zealand Oneday Cricket World Cup 2023
World Cup 2023: गोळीच्या वेगाने आलेल्या चेंडूवर, जो रूटने रिव्हर्स स्वीप मारत ठोकला शानदार षटकार, पाहा VIDEO
IND vs NED: Why did Virat Kohli suddenly leave Team India? Will the match not be played against Netherlands
IND vs NED: अनुष्काच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा अन् विराट कोहली सराव सामना सोडून परतला घरी; टीम इंडियाची सोडली साथ? जाणून घ्या
World Cup 2023: Ashwin's duplicate rejects the offer Kangaroos who is Mahesh Pithiya refused to train with Australia
World Cup 2023: अश्विनच्या डुप्लिकेटने कांगारूंच्या मनसुब्यांवर फिरवले पाणी, कोण आहे ‘हा’ खेळाडू ज्याने ऑस्ट्रेलियाबरोबर सरावास दिला नकार?
A stunning comeback Shreyas Iyer's amazing catch by Shaun Abbott and the umpire gives not out Watch the video
IND vs AUS 2nd ODI: जबरदस्त पुनरागमन! श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने पकडला अप्रतिम झेल अन् अंपायरने दिले नॉटआऊट; पाहा Video

पुढे कुंबळे म्हणाला की, “सूर्यकुमारला जडेजाच्या आधी पाठवता आले असते, कारण तो एक चांगला फलंदाज आहे. तुम्ही त्याच्याकडून ती षटके खेळण्याची अपेक्षा करू शकता.”सूर्यकुमार यादवने अंतिम सामन्यात खेळलेल्या आपल्या डावात २८ चेंडूत १८ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य सहज गाठले आणि सहावे विजेतेपद पटकावले.

हेही वाचा: IND vs AUS: “१६ तास झाले, पण अजूनही दु:ख…”, भारताच्या वर्ल्डकप पराभवावर शुबमन गिलची इन्स्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत

चर्चेत सहभागी झालेला माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टॉम मूडी म्हणाला, “जर ते वानखेडे स्टेडियम असते, सेमीफायनलमध्ये असणारी सपाट खेळपट्टी असती तर त्यावेळी मी सूर्यकुमारला संघात घेतले असते. त्यावेळी त्याने ६०-७० धावा करून संघाला हातभार लावला असता. इथे मला त्याच्या जागी इशान किशन संघात असणे आवश्यक वाटत होते. विजयी संघात बदल करत नाही, हे मी समजू शकतो. मात्र, जेव्हा तुम्ही थोडं आव्हानात्मक असलेल्या खेळपट्टीवर खेळत असता, तेव्हा तुम्ही त्याच्यासारख्या आक्रमक आणि प्रभावशाली खेळाडूला शेवटच्या १० षटकांमध्ये प्रभाव पाडणे जवळजवळ अशक्य करून टाकता. म्हणून, १५ पेक्षा जास्त षटके असताना त्याला फलंदाजीला बोलवले गरजेचे होते. त्याला खेळपट्टीचा अंदाज आणि वेगाशी परिचित होण्यास मदत झाली असते.”

हेही वाचा: IND vs AUS: “विराट बाद झाला तेव्हा प्रेक्षकांची शांतता…” टीम इंडियाच्या पराभवानंतर पॅट कमिन्सने भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळले

मोठ्या स्पर्धांमध्ये संघाची अशी कामगिरी होती

राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने तीन आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत प्रवेश केला. २०२२ टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध पराभव झाला. त्यानंतर, २०२३च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा बाद फेरीत पराभव केला आणि भारतीय संघाचे विश्वचषक विजयाचे स्वप्न अधुरे राहिले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: You had to give your best players a chance anil kumble points out jadeja ahead of suryakumar avw

First published on: 20-11-2023 at 19:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×