वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेला आज ४२ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं औचित्य साधत सिक्सर किंग युवराज सिंगनं त्याला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. ख्रिस गेल आणि युवराज सिंग यांची चांगली मैत्री आहे. युवराज आणि गेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात एकत्र खेळत होते. एकत्र रुम शेअर केले आहेत. दोन्ही खेळाडू आपल्या मजेशीर अंदाजात सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. ख्रिस गेल आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाब किंग्सकडून खेळत आहे. आज राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेल खेळणार आहे. या सामन्यापूर्वी युवराजने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत ख्रिस गेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओत ख्रिस गेल नाचताना दिसत आहे. तसेच युवराज सिंगही आपल्या नृत्याची कसब दाखवताना दिसत आहे.

“युनिवर्स बॉस ख्रिस गेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा. एमजे मूव्ह्ससह कितीतरी रात्र गाजवल्या. तुला नक्की खात्री आहे का विराट माझ्यापेक्षा चांगलं नाचतो?”, अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर युवराज सिंगने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबचा संघ आयपीएल २०२१ स्पर्धेत आतापर्यंत ८ सामने खेळला आहे. त्यापैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे, तर ५ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. या कामगिरीसह गुणतालिकेत पंजाबचा संघ सातव्या स्थानावर आहे. गेलने आठ सामन्यात १७८ धावा केल्या आहेत.