Yuvraj Shares A Story With Rohit: क्रिकेट विश्वात हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. तो आज ३६ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी रोहितला वाढदिवसानिमित्त मजेशीर पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंगनेही रोहित शर्माला वाढदिवसानिमित्त वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. वास्तविक, युवराजने रोहितला शुभेच्छा देताना एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्वतः रोहितची खिल्ली उडवत आहे. या व्हिडिओसोबत युवराज सिंगने सोशल मीडियावर शुभेच्छा देणारा संदेशही पोस्ट केला आहे.

सिक्सर किंगने रोहितचे गुपित उघड केले –

युवराज सिंगने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने रोहित शर्माचे एक गुपित उघड केले आहे. युवराज त्या व्हिडिओमध्ये रोहितचा एक मजेशीर किस्सा सांगत आहे, जो आयपीएलच्या पहिल्या सत्रातील उद्घाटन समारंभाचा आहे. व्हिडिओमध्ये युवीने सांगितले की, “रोहितने मला आयपीएलच्या उद्घाटन समारंभाच्या दिवशी विचारले होते, भाऊ, तू उद्घाटन समारंभाला येत नाहीस का? मी नकार दिला की नाही यार, मी येत नाही. त्यानंतर रोहितने ‘फ्लोरिडा’ येणार असल्याचे सांगितले. मी विचारले, फ्लोरिडा कोण आहे? रोहित म्हणला जो धष्टपुष्ट आहे, गाणी आणि रॅप गातो.” तो फ्लो रिडा असल्याचे युवीने सांगितले. प्रत्युत्तरात रोहित म्हणाला, ‘पाजी तुम्हाला काय माहीत?’

युवीने त्याच्या पोस्टमध्ये काय लिहिले?

युवराज सिंगने या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा ब्रॉथमन, जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तू संघात तरुण होतास, पण आज तू संघाचे नेतृत्व करत आहेस. तुला अभिमान वाटला पाहिजे की तू किती पुढे आला आहेस. आशा आहे की तुम्ही खूप धावा करशील आणि यावर्षी ट्रॉफी घरी आणाल.” रोहितकडे यावर्षी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आहे, तर वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे.

हेही वाचा – IPL 2023: ‘हे’ चार सर्वात कमनशिबी स्टार खेळाडू, जे संधीचे सोने करण्यासाठी उत्सुक, जाणून घ्या कोण आहेत?

चहलने मजेशीर पद्धतीने शुभेच्छा दिल्या –

युवराज सिंग व्यतिरिक्त युजवेंद्र चहलनेही रोहित शर्माला त्याच्या वाढदिवसानिमित्त मजेशीर पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. चहलने रोहितची पत्नी रितिका हिच्या वाढदिवसाची संपूर्ण पोस्ट कॉपी करून ट्विटरवर पोस्ट केली आहे. चहलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “संपूर्ण जगातील माझ्या आवडत्या सर्वात चांगल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझा सर्वात चांगला मित्र, जगातील इतरांपेक्षा मला जास्त हसवणारी व्यक्ती.. वाढदिवसाच्या शुभेच्छा रोहित शर्मा. सीसी:- रितिका वहिनी”