अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला असल्याची माहिती आहे. संजय दत्त उपचार घेण्यासाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे. संजय दत्तने वैद्यकीय उपचारांसाठी काही काळ चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्याची माहिती दिली होती. त्यानंतर फिल्म ट्रेड अ‍ॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी रात्री ट्विट करुन ही माहिती दिली. त्यानंतर कर्करोगावर यशस्वीपणे मात करणाऱ्या युवराज सिंगने संजय दत्तला खास संदेश दिला.

“संजय दत्त, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तू लढाऊ वृत्तीचा होतास आणि नेहमीच राहशील. कर्करोगाच्या आजारातील होणाऱ्या वेदना मला माहिती आहेत. पण मला हेदेखील माहिती आहे की तू या संकटाला धैर्याने सामोरा जाशील आणि कर्करोगावर मात करशील. मी तुझ्यासाठी प्रार्थना करतोच आहे. तू लवकर तंदुरूस्त हो”, असा संदेश युवराजने संजय दत्तला दिला.

आणखी वाचा- संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर, पत्नी मान्यता म्हणाली…

आणखी वाचा- अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर, उपचारासाठी परदेशी जाण्याची शक्यता

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र संजय दत्तला डिस्चार्जही देण्यात आला. नंतर त्याला लंग कॅन्सरचे निदान झाले. मंगळवारीच अभिनेता संजय दत्तने एक ट्विट करुन कामातून ब्रेक घेत आहोत असं म्हटलं होतं. हा ब्रेक वैद्यकीय उपचारासाठी असून मी लवकरच परत येईन असंही संजय दत्तने म्हटलं होतं. शनिवारी संध्याकाळी संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्याला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. संजय दत्तची करोना चाचणीही झाली होती. ज्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.