scorecardresearch

Yuvraj Meet Rishabh: युवराज सिंगने घेतली ऋषभ पंतची भेट; फोटो शेअर करत युवा खेळाडूसाठी लिहली मन जिंकणारी पोस्ट

Yuvraj Singh Meet Rishabh Pant: भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने ऋषभ पंतची भेट घेऊन त्याची प्रकृतीची स्थिती जाणून घेतली. याबाबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत माहिती दिली आहे.

Yuvraj Singh Meet Rishabh Pant
युवराज आणि ऋषभ (फोटो- इंस्टा)

स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत अपघातात मृत्यूला मात देऊन बरा झाला आहे. अलीकडेच त्याने स्विमिंग पूलमध्ये उतरतानाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. आता माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंगने त्याची भेट घेऊन त्याच्या फिटनेसबाबत माहिती सांगितली आहे. युवराज सिंगने गुरुवारी संध्याकाळी ऋषभ पंतसोबतचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये युवी आणि पंत सोफ्यावर बसले आहेत. पंतच्या उजव्या पायाला अजूनही पट्टी बांधलेली आहे, ज्यामुळे त्याच्या दुखापतीचा अंदाज लावता येईल.

पंतला भेटल्यानंतर युवराजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “छोटी-छोटी पावले सुरू झाली आहेत. हा चॅम्पियन लवकरच पुन्हा उठण्यासाठी सज्ज झाला आहे.” युवराजने पुढे लिहिले, “त्याला भेटून आणि मजा-मस्ती करुन खूप छान वाटले. किती छान मुलगा, नेहमी सकारात्मक आणि मजेदार वृत्ती. ऋषभ तुला खूप शक्ती मिळो.”

डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार –

पंत किती काळ बरा होईल याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु त्याच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद देण्यात आले आहे, तर अक्षर पटेल उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे. पंतला लवकरच मैदानात पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.

युवराजची प्रेरणा मदत करेल –

आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी तो बरा होईल, अशी आशा आहे. १२ वर्षांपूर्वी कॅन्सरशी झुंज देत असताना युवराज सिंगने टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवले होते. कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर युवीने जोरदार पुनरागमन केले. अशा परिस्थितीत युवराजच्या प्रेरणेने पंतच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास मदत होईल.

हेही वाचा – PSL 2023: बाबर आझमचा टी-२० क्रिकेटमध्ये मोठा धमाका! ख्रिस गेलचा ‘हा’ विक्रम मोडला

ऋषभ पंत त्याच्या क्रिकेट चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या तब्येतीची माहिती देत ​​असतो. या एपिसोडमध्ये, काही दिवसांपूर्वी, त्याने बुद्धिबळ खेळतानाचा एक फोटो शेअर केला आणि विचारले की मी कोणासोबत खेळतोय ते सांगा. दुसरीकडे, पंतने यापूर्वी त्याच्या अस्थिबंधनाच्या झीजशी संबंधित ऑपरेशनचे अपडेट दिले होते. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि शुभेच्छांसाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे, असे त्यांनी लिहिले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 23:56 IST
ताज्या बातम्या