Zaheer Khan on Shivam Dube and Hardik Pandya : हार्दिक पंड्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे त्याचवेळी हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत शिवम दुबेला संधी मिळाली. शिवम दुबेने फलंदाजीसोबतच आपल्या गोलंदाजीनेही छाप पाडली आहे. पण प्रश्न असा आहे की जर हार्दिक पंड्याने पुनरागमन केले, तर शिवम दुबेला संधी मिळणार का? हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे टी-२० विश्वचषक संघात खेळणार का? मात्र या प्रश्नाचे उत्तर भारताचा माजी क्रिकेटर झहीर खानने दिले आहे.

हार्दिक पंड्यासोबत शिवम दुबेलाही टी-२० विश्वचषक संघात संधी मिळू शकते, असा विश्वास झहीर खानला वाटतो. जिओ सिनेमावर बोलताना झहीर खान म्हणाला, “तुम्ही सहाव्या गोलंदाजीचा पर्याय शोधत आहात की पाच गोलंदाज खेळू इच्छित आहात यावर हे अवलंबून असेल. तुम्हाला कोणत्या दिशेने जायचे आहे?” हार्दिक पंड्या सध्या दुखापतीतून सावरत असून तो पुन्हा फिटनेसवर काम करत आहे. दुसरीकडे, शिवम दुबेने मागील टी-२० मालिकेत अप्रतिम कामगिरी करून स्वत:ला सिद्ध केले आहे.

Questions before the selection committee regarding the selection of Gill and Jaiswal for the Twenty20 World Cup cricket tournament
गिल की जैस्वाल? ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीसमोर यक्षप्रश्न
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
not to share any photo or video of the stadium on their accounts on the day of the match.
IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना
Manoj Tiwary's statement on Shivam Dube
Team India : ‘विश्वचषकासाठी शिवम दुबेची निवड न झाल्यास CSK जबाबदार असेल..’ भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

अशा परिस्थितीत हार्दिकला मुख्य संघात सामील करण्याबरोबर दुबेला बॅकअप म्हणून ठेवता येईल, असे झहीर खानचे मत आहे. झहीर खान पुढे म्हणाला, “तुम्हाला सहाव्या गोलंदाजीचा पर्याय हवा आहे असे तुम्ही म्हणत असाल, तर तुम्हाला बॅकअपची पण गरज आहे. जर संघाबद्दल बोलायचे तर तुम्ही दोन यष्टिरक्षकांऐवजी एक यष्टिरक्षक घेतला तरच हार्दिक आणि शिवम दुबे दोघेही एकत्र संघात दिसू शकतात.”

हेही वाचा – AUS vs WI : जोश हेजलवूडने विकेट्स घेताच ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ‘हे’ घडलं

शिवम दुबेने अफगाणिस्तानविरुद्ध प्रभावित केले –

शिवम दुबेने अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत शानदार कामगिरी केली. तो मालिकेत १२४ धावा करत २ विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला. या मालिकेत दुबेला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार देण्यात आला. आता या उत्कृष्ट कामगिरीनंतर आगामी टी-२० विश्वचषकासाठी त्याने हार्दिक पंड्यासमोर जबरदस्त आव्हान उभे केल्याचे स्पष्ट झाले आहे. हार्दिक पंड्याने भारतातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असल्याचे सिद्ध केले आहे, परंतु दुबेने सध्या केलेल्या कामगिरीकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.