News Flash

पूर्णब्रह्म : पोहा भुजिंग

हिरव्या मिरच्या, लसूण-आलं व सर्व गरम मसाला एकत्र जाडसर वाटून घ्या.

दीपा पाटील

साहित्य

अर्धा किलो चिकन (कोंबडी), २ वाटी जाडे पोहे, २ मोठे बटाटे, ५-६ हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या, २ इंच आलं, १० लवंगा, २ दालचिनी, २ मोठय़ा मसाला वेलची, २ मोठे तेजपत्ता, १ चमचा काळीमिरी, १ चमचा जिरे किंवा शहाजिरे, १ चमचा हळद, अर्धा वाटी तेल, मीठ चवीनुसार.

कृती

हिरव्या मिरच्या, लसूण-आलं व सर्व गरम मसाला एकत्र जाडसर वाटून घ्या. त्यातील अर्धा मसाला चिकनला लावून अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा व नंतर ओव्हनमध्ये २० मिनिटे ग्रिल करून घ्या किंवा तंदूर करा. पातेल्यात तेल गरम करा, त्यात बटाटय़ाचे गोल काप टाका. ते लालसर झाल्यावर उरलेला अर्धा मसाला टाका. हळद टाका व चिकनचे तुकडे टाकून चांगलं परतवा व पाण्याचा हबका मारून वरून जाड पोहे टाका. वर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवा. एक वाफ आणा व गरम गरम वाढा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 4:00 am

Web Title: poha bhujing recipe zws 70
Next Stories
1 उत्सवाचे पर्यटन : राजस्थानी महोत्सव
2 घरातल्या घरात : ‘मोझॉक सीडी’ आरसा
3 शहर शेती : सुंदर- मनमोहक गुलाब
Just Now!
X