शहरशेती : गुलाब आणि मोगरा

गुलाब : हे शीत कटिबंधातील झाड असल्यामुळे हिवाळ्यात जास्त फुले येतात.

किमान ४-५ तास ऊन येत असेल तर आपण अनेक प्रकारची फुलझाडे लावू शकतो. आज आपण हिवाळ्यात जास्त फुले देणारा गुलाब व उन्हाळ्यात जास्त फुलणारा मोगरा यांची माहिती घेऊ या.

गुलाब : हे शीत कटिबंधातील झाड असल्यामुळे हिवाळ्यात जास्त फुले येतात. महाराष्ट्रात महाबळेश्वरला जंगली गुलाबाच्या जाती आहेत. ती तिथे सहजपणे करवंदाच्या जाळीसारखी वाढतात. गुलाबात तीन प्रमुख प्रकार आहेत.

१. एच.टी. हायब्रिड टी- ही फुले मोठी असतात. एका फांदीवर एकच फूल येते. ही पुष्पगुच्छात व फुलदाणीत टिकतात. फुलांना लांब दांडी ठेवून कापतात. चार ते सहा दिवस झाडावर टिकतात. त्यांना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा सूर्यप्रकाश आवश्यक असतो.

२. फ्लोरीबंडा- पाकळ्या कमी असतात. ती भरपूर प्रमाणात आणि अनेकदा घोसात येतात. ५-६ तास ऊन मिळले, तरीही फुले येतात.

३. मिनिएचर- झाड, पान, फूल सगळेच छोटे असते. ही बाल्कनीत लावण्यासाठी सर्वात योग्य. गावठी वेलीचे गुलाबही छान वाढतात. त्यांच्या पाकळ्यांचा गुलकंदही तयार करता येतो. जास्त पावसाच्या प्रदेशात गुलाबांवर बुरशीजन्य रोग येतात. रोगांपासून संरक्षणाची आणि छाटणीची आवश्यकता असते. नवीन फुटीवरच फुले येतात. अन्न (खत) थोडे थोडे पण नियमित द्यावे लागते. पाण्याचा उत्तम निचरा झालाच पाहिजे.

मोगरा : याला प्रामुख्याने थंडी कमी झाल्यावर फुले येतात. सहसा कीड/रोग येत नाहीत. एकेरी, पुणेरी, मोतिया बटमोगरा, मदनबाण, मल्लिका असे अनेक प्रकार आहेत. ही जस्मिन वर्गातील सुगंधी झुडपे/वेली आहेत. नीट काळजी घेतल्यास वेलीसारखी वाढू शकतात. नवीन कोंबावर कळ्या येतात. हलकी छाटणी, जुनी पाने साधारण जानेवारीच्या अखेरीस काढून त्याच कुंडीत टाकावीत. दोन-चार दिवस पाण्याचा ताण द्यावा. थोडे खत घालून पाणी दिल्यावर नवीन फुटवे येऊन फुले येतात.

rsbhat1957@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: %e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80 %e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ac %e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf %e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%be