कसे कराल?

आजच्या व्यायाम प्रकारात आपण थेराबँडचा वापर करणार आहोत. थेराबँड हा रबर बँडचाच मोठा प्रकार आहे. अनेक व्यायामप्रकारांत त्याचा उपयोग केला जातो.सुप्रास्पिनॅट्स मसल्स (खांद्याच्या मागील बाजूस असलेले स्नायू) मजबूत करण्यासाठी हा व्यायाम आपण करणार आहोत. हा स्नायू खांद्याच्या सांध्याजवळ असतो. हा स्नायू बाहेरील बाजूस दिसत नाही. खांद्याच्या सांध्याची हालचाल करण्यासाठी हा स्नायू महत्त्वपूर्ण आहे. आजचा व्यायामप्रकार या स्नायूच्या बळकटीकरणासाठी आहे.

1

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थेराबँडचे एक टोक पायाखाली घट्ट पकडून ठेवा. थेराबँडचे दुसरे टोक हाताच्या पंजाला गुंडाळून तेही घट्ट पकडून ठेवा. (थेराबँडचे टोक ताणल्यानंतर सुटू नये यासाठी ते हाताच्या पंजाला गुंडाळावे.)असे करताना थेराबँड जास्त ताणू नका. हाताचा कोपर मात्र सरळ ठेवा. (छायाचित्र १ पाहा)

2

आता हात हळूहळू वर घ्या. हात वर घेताना थेराबँडला थोडा ताण द्या. हात जवळपास ४५ अंशापर्यंत वर उचला. असे करताना खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूला थोडा ताण द्या. (छायाचित्र २ पाहा) या व्यायामाने केवळ खांद्याचाच स्नायू नव्हे, तर मनगटाचा स्नायूही बळकट होतो.

–  – dr.abhijit@gmail.com