उन्हाळा लागला की घरात पाण्याच्या, शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्या जमा होतात. विनाकारण पसारा आणि कचरा गोळा होतो. त्यातच शाळेला सुट्टी म्हणजे घरातले जुने पुराणे कपडे बाहेर काढून कपाटे नीट लावून ठेवण्याचा काळ. या काळात निर्माण होणारा हा कचराच घर सजवण्यासाठी वापरता आला तर? पाणी आणि शीतपेयांच्या बाटल्यांची झाकणे आणि जुन्या कपडय़ांची तुटलेली बटणे गोळा करू ठेवा. त्याची सुंदर फोटोफ्रेम बनवता येऊ शकते.
साहित्य :
जुन्या निरुपयोगी बाटल्यांची झाकणे, जुन्या कपडय़ांची बटने, कार्ड पेपर, कात्री, टिकल्या, ग्लीटर, पुठ्ठा, गम.
कृती
- ९ इंच उंच आणि ७ इंच रुंद आयताकृती पुठ्ठा घ्या. आतील बाजूस ७ इंच उंच आणि ५ इंच रुंद कापा.
- जसा फोटो असेल तसा आडवा किंवा उभा आकार घ्या.
- बाहेरील पट्टीवर चार कोपऱ्यांत बाटल्यांची लहान मोठी झाकणे चिकटवा.
- या झाकणांवर त्यांचा रंग आणि काही अक्षरे, नक्षी असल्यास ते लपेल एवढय़ा प्रमाणात ग्लीटर लावा.
- आतील कापलेल्या भागाच्या कडांवर गम पसरवा व त्यावर बटणे चिकटवा.
- मागील बाजूस तीन बाजू बंद होतील असा कार्ड पेपर चिकटवा.
- आतमध्ये फोटो सरकवा, टिकाऊ फोटो फ्रेम तयार!
- शक्य असल्यास त्याला पुठ्ठय़ाचे टेकू द्या, अन्यथा भिंतीच्या आधारानेही ही फ्रेम ठेवता येईल.
apac64kala@gmail.com