तुमचं भविष्य हे तुम्ही तुमचा व्यक्तिगत विकास कसा साधता यावर अवलंबून असतं. नित्य नेमाने तुम्ही स्वत:मध्ये ज्या सुधारणा घडवून आणता त्याद्वारेच तुम्हाला भविष्यात नवनव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. हे लक्षात असू द्या की, तुम्ही जेव्हा स्वत:चं व्यक्तिमत्त्व विस्तारता तेव्हा आपोआपच तुम्ही तुमच्या पर्यायांचं, संधींचं आणि शक्यतांचं क्षितिजही विस्तारता..

स्वत:च्या विकासावर लक्ष केंद्रित करता आलं की, आपल्याला बरंच काही संपादन करता येतं. तुम्हाला जे व्हायचंय, ते तुम्हाला बनता येतं. मात्र, त्याकरता कितीही अडथळे आले तरी तुम्ही सतत पुढे चालत राहायला हवं. स्व-विकासाचे हे काही मंत्र तुमच्यासाठी..

lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
ग्रामविकासाची कहाणी

जेव्हा तुमची स्वप्नं आणि तुमचं ध्येय हे तुमची आवड, व्यक्तिमत्त्वातील बलस्थानं आणि तुमच्या मूल्यांशी मिळतंजुळती असतात तेव्हा तुमच्यात काहीतरी करायच्या प्रेरणा जाग्या होतात. जेव्हा तुम्हाला साध्य करण्यासाठी पुरेसं महत्त्वाचं ध्येय असतं तेव्हा तुमच्या अंत:प्रेरणा जाग्या करणं कठीण नसतं.

जव्हा तुमच्या करिअरचा सदैव नकारात्मक विचार करता, तक्रार करत राहता तेव्हा तुमची कामे, प्रकल्प अर्धवट राहतात.. अशा वेळी ज्या कृती करणं गरजेचं आहे त्या करत राहायला हव्यात. तुमचं ध्येय जागं होण्यासाठी आवश्यक ठरणारं आयुष्याचं बळकट स्वप्न तुम्हाला सापडायला हवं. तुमची बुद्धिमत्ता आणि मूल्यांचा योग्य वापर केला तर तुमचा विकास साधायला मदत होते.

स्व-विकासाच्या वाटचालीची सुरुवात लहानशा, साध्यासोप्या प्रकल्पाने करायला हवी. सुरुवातीलाच प्रचंड मोठय़ा प्रकल्पांचं शिवधनुष्य पेलण्याचा आततायीपणा न केलेला बरा! त्याचे लगेचच सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशा अपेक्षेत राहिलात तर तुमच्या पदरी निराशा पडण्याचीच शक्यता अधिक असते.

तुम्ही दररोजच्या सकारात्मक सवयी वाढवा. उदा. जर तुम्हाला तुमची संवादकौशल्ये वाढवायची असतील तर त्याबाबतची एक बाब निवडा आणि ती तुमची नित्याची सवय होईल इतका त्याचा नेमाने सराव करा.

अध्ययनाची प्रक्रिया आनंदाने अनुभवा. आपल्याला भविष्यात कुठे पोहोचायचे आहे, हे जोखण्याची दृष्टी विकसित करणे महत्त्वाचे. मात्र त्याहून आवश्यक म्हणजे आताचा क्षण मनमुरादपणे जगणं अधिक आवश्यक असतं. तुमच्या विकासासोबत तुमची प्रेरणाही सतत जागी राहावी, याकरता शिकण्याची प्रक्रिया आनंदाने अनुभवा आणि त्याचे महत्त्व तुम्हाला ठाऊक असायला हवं. दैनंदिन कामांवर लक्ष केंद्रित करून त्यात आनंद अनुभवायला शिकणं हे सतत पुढे वाटचाल करण्यासाठी आवश्यक ठरतं.

’तुमच्यात बदल घडून आणण्यासाठी आजच्यापेक्षा अधिक चांगला दिवस दुसरा नाही, हा दृष्टिकोन विकसित करायला हवा. प्रारंभ केल्याशिवाय तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकत नाही आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्हाला ती तुमची दररोजची सवय बनणे आवश्यक असते.

तुमचं उद्दिष्ट आणि ध्येयप्राप्ती यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी दैनंदिन शिस्त बाणवणे गरजेचे असते. या वाटचालीत तुम्ही तुमच्या व्यक्तिगत विकासाची उद्दिष्टं लिहून काढणं उपयोगी ठरू शकतं. तसेच सतत पुढे सरकण्याचं मनोबल निश्चित करायला हवं. विकासाचा दृष्टिकोन विस्तारणं हे स्वत:मध्ये बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक ठरतं.

तुम्ही एखाद्या वैशिष्टय़पूर्ण उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जर तुम्ही तुमच्या व्यक्तिगत विकासावर लक्ष केंद्रित केलं तर आयुष्यातील वर्तमान क्षणांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल आणि त्यातून तुम्ही परिपक्व होऊ शकता. यातूनच तुम्हाला पुढे वाटचाल करण्याची ऊर्मी मिळते.

स्व-विकासासाठी कुतूहल जागे ठेवा. जेव्हा तुमच्यात औत्सुक्य जागे असते तेव्हा तुमची नव्या गोष्टी शिकण्याची उमेद जागी असते. उत्सुक व्यक्तींना नेहमी नव्या कल्पना, अनुभवांत स्वारस्य असतं आणि ते इतरांच्या विचारांचा मागोवा घेत असतात. स्व-प्रेरणा तेवत राहण्यासाठी कुतूहल जागे ठेवणे आवश्यक असते. त्याकरता वयाची अट आवश्यक नाही, फक्त तुमचा दृष्टिकोन जागा असणं आवश्यक असतं.

’हान मुलं ज्याप्रमाणे सतत का, हा प्रश्न विचारत राहतात त्याचप्रमाणे तुम्ही करायला हवं. सतत प्रश्न विचारत राहिलात तर तुमच्यातील अहंकार गळून पडतो आणि शिकण्याद्वारे आपल्यात बदल होऊ शकतो आणि आपलं व्यक्तिमत्त्व अधिकाधिक सक्षम होतं.

अध्ययनाचा सर्वात मोठा भाग म्हणजे यशापयशाची जोखीम पत्करणं आणि अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून बघणं.

भीतीवर ताबा मिळवणं आणि नवं करण्यासाठी उत्सुक राहणं यातून तुम्ही अध्ययनाच्या नव्या संधी मिळवू शकता. कुतूहलातून तुम्ही सत्याच्या नवनव्या वास्तवापर्यंत पोहोचू शकता आणि उत्तराचे कितीतरी पर्याय तुमच्यासमोर उलगडत जातात. म्हणूनच स्व-विकासाच्या प्रवासाचा आनंद घ्या आणि शिकण्याच्या नवनव्या संधी शोधा.

अपर्णा राणे