08 July 2020

News Flash

प्लास्टिक कचऱ्यातून कलेची जादू

पर्यावरणपूरक जीवनशैली ही आजची गरज असल्याचं वेगवेगळ्या माध्यमातून सांगण्यात आलं.

गेल्या शुक्रवारी वसुंधरा दिन साजरा झाला. पर्यावरणपूरक जीवनशैली ही आजची गरज असल्याचं वेगवेगळ्या माध्यमातून सांगण्यात आलं. पण वेगवान जीवनशैलीच्या जमान्यात जुन्याकडे पुन्हा वळून बघण्यासाठी वेळ आहे कुणाला? प्रत्येक वस्तूचा पूरेपूर वापर करण्याची भारतीयांची सवय आता आपल्याकडेच ‘पुराने जमाने की’ मानली जाते आणि ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’मानसिकता नवी म्हणून आपलीशी करावीशी वाटते. पण ही मानसिकता चिरकाल टिकणारी नाही. ती आपण पाश्चिमात्यांकडून घेतली आणि आता तिथेच ती संकल्पना टाकाऊ बनतेय. सध्या तिथे दबदबा वाढतोय- ‘अपसायकलिंग’चा. रिसायकलिंगसोबत अपसायकलिंग ही संकल्पना आता जगात सगळीकडे आपलीशी केली जाऊ लागली आहे. अपसायकलिंग म्हणजे आपलं ‘टाकाऊतून टिकाऊ’. जुन्या वस्तू, कपडे फेकून देण्याऐवजी त्यापासून कलात्मक आणि उपयुक्त काही बनवण्याची युक्ती. अपसायकलिंग हा रिसायकलिंगचा कलात्मक अवतार. म्हणजे नुसताच पुनर्वापर नाही, तर वापरलेल्या वस्तूपासून सौंदर्यपूर्ण आणि नवी कलाकृती निर्माण करायची. हे पर्यावरणपूरक कलात्मक काम करणाऱ्या काही तरुण कलावंतांची आणि त्यांच्या कलाकृतींची ओळख ही ओळख..

प्लास्टिकच्या पिशव्या निसर्गासाठी खूपच हानिकारक आहेत. हे माहीत असूनही आपली प्लास्टिक पिशव्या वापरण्याची सवय जात नाही. वापर करून झाला की, पिशव्या तिथेच टाकण्याची सवय काही लोकांमध्ये असते. त्याच प्लास्टिक पिशव्या गोळा करून त्यातून रोजच्या वापरात टिकतील अशा, पुनर्वापर करण्यायोग्य सुंदर पिशव्या करण्याचं काम अमिता देशपांडे ‘आरोहना सोशन डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या माध्यमातून करते.

3मूळ पुण्याची असलेली अमिता देशपांडे हिने आपला सहकारी नंदन भट याच्या बरोबरीने ‘आरोहना’ची सुरुवात केली. हे दोघेही तरुण इंजिनीअरिंगची पाश्र्वभूमी असलेले आहेत. आपल्या या ‘अपसायकिलग’च्या कामाविषयी अमिता म्हणाली, ‘इंजिनीअिरग पूर्ण करून मी आय.टी. क्षेत्रात काम करत होते. परंतु पर्यावरणाविषयी काही काम करावं या उद्देशानं मी अमेरिकेत जाऊन ‘इंडस्ट्रियल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ हा विषय घेऊन मी एम.एस. केलं. ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या विषयवार माझा फोकस ठेवून मी माझं ‘मास्टर्स’ पूर्ण केलं. पुढे चार र्वष नोकरी केली आणि भारतात येऊन ही संस्था सुरू केली. माझा सहकारी नंदन भटसुद्धा इंजिनीयर आहे आणि त्याने एम. बी. ए. केलं आहे. लोक पर्यावरणाविषयी जागरूक झाले तरीही अजूनही प्लास्टिक पिशव्या आणि पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या इतर वस्तू वापरणं सोडत नाहीत. असंख्य प्लास्टिक पिशव्या जिकडे तिकडे पडलेल्या दिसतात. अशा पिशव्या गोळा करून आम्ही त्यापासून नेहमीच्या वापरात येतील अशा बॅग्स, लॅपटॉप बॅग्स, कव्हर्स, मोबाइल कव्हर्स, लहान िस्लग बॅग्स अशा वस्तू आम्ही बनवतो. सर्व वयोगटातले स्त्री-पुरुष वापरू शकतील अशा वस्तू आम्ही या प्लास्टिकच्या कचऱ्यातून बनवतो.

या कामात महिला बचत गटाच्या स्त्रियांची आम्ही मदत घेतो. ज्यांना विणकाम येतं, हातमाग चालवता येतो त्यांची आम्ही मदत घेतो. पहिले गोळा केलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या आम्ही स्ट्रिप्स बनवून घेतो. त्यानंतर त्यापासून हातमागावर कापड बनविले जाते आणि त्यापासून आम्ही सगळ्या बॅग्स बनवतो. बनवताना कोणतेही केमिकल, रंग किंवा इतर अनसíगक पदार्थ आम्ही वापरत नाही. आम्ही बनवत असलेल्या बॅग्सचे रंग हे मूळ प्लास्टिक पिशवीच्या रंगानुरूपच असतात. याचीच वेगवेगळी कॉम्बिनेशन्स आम्ही करतो.’

अमिताच्या संस्थेने बनवलेल्या पिशव्या, पर्स बघून या प्लास्टिकच्या पिशव्यांपासून बनवल्यात हे खरं वाटत नाही. प्लास्टिकच्या अपसायकलिंगचा इतका सुंदर आविष्कार बघायला अनेक ठिकाणाहून लोक येतात. ‘या सगळ्यांतून आम्ही निसर्गाचे संवर्धन करा, आपल्या संस्कृतीचे जतन करा, येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी पावले उचला असाच संदेश द्यायचा प्रयत्न करतो’, असं अमिता सांगते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2016 1:16 am

Web Title: useful products from waste
टॅग Loksatta,Viva
Next Stories
1 बाईमाणूस आणि भाईमाणूस
2 मंदिर प्रवेशाच्या गाभाऱ्यात..
3 विदेशिनी: वास्तूंच्या जतन-संवर्धनाचा वसा
Just Now!
X