News Flash

BHIM अॅप ऑफर : विमान प्रवासावर मिळणार ५ हजारांची सूट !

BHIM अॅपद्वारे घरगुती विमान प्रवासाचं तिकीट बूक केल्यास तुम्हाला ५ हजार रुपयांची सूट मिळू शकते.

विमानाचं तिकीट बूक करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. BHIM अॅपद्वारे घरगुती विमान प्रवासाचं तिकीट बुक केल्यास तुम्हाला ५ हजार रुपयांची सूट मिळू शकते. इंडिगो आणि गोएअर कंपनीने २० लाख सीटसाठी सेल ऑफर सुरू केली आहे. याशिवाय स्पाइस जेटचे तिकीट बुक केल्यावरही तुम्हाला ५,००० रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. तसंच, स्पाइस जेटच्या वन वे ट्रिपवर ५०० रुपये आणि राउंड ट्रीपवर १००० रुपयांची सूट देखील तुम्ही मिळवू शकता. यासाठी तुम्हाला केवळ भीम अॅपद्वारे तिकीट बुक करावं लागेल.

जाणून घेऊया या ऑफरचा लाभ कसा घ्यायचा –
– सर्वप्रथम तुम्ही https://www.thomascook.in या संकेतस्थळावर जा
– त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण आणि इतर आवश्यक सर्व माहिती टाका
– आता तुम्हाला BHIMUPI प्रोमो कोड पेमेंट करताना टाकावा लागेल.
– त्यानंतर ऑर्डर चेक आउट करा आणि भीम युपीआयच्या माध्यमातूनच पेमेंट करा
– लक्षात ठेवा ३१ डिसेंबरपर्यंत ही ऑफर आहे. पण, १ ते १० नोव्हेंबर आणि ३१ डिसेंबर रोजी ही ऑफर मिळणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 1:42 pm

Web Title: bhim app offer book domestic flights and get discount upto 5000 rs
Next Stories
1 ४ टन ऊसापासून साकारले गणपती बाप्पा
2 यापुढे कपडे जाळणार नाही, ५ वर्षांत ८०६ कोटींची उत्पादनं जाळणाऱ्या बर्बरी ब्रँडचा निर्णय
3 ट्रॅफिक सिग्नलला वैतागल्या असंयमी चालकानं पाहा काय केलं
Just Now!
X