News Flash

टीव्हीएस Apache च्या किंमतीत झाला बदल, जाणून घ्या नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

या बाइकमध्ये रेसिंग ग्राफिक्सचा वापर ...

TVS मोटर्स कंपनीने आपली Apache RTR 200 4V च्यी किंमतीत वाढ केली आहे. बीएस-6 इंजिनमध्ये लाँच झाल्यापासून कंपनीने बाइकच्या किंमतीत दुसऱ्यांदा वाढ केली आहे. टीव्हीएसने Apache RTR 200 4V च्या किंमतीत मे महिन्यात 2,500 रुपये वाढ केली होती. त्यानंतर आता पुन्हा या बाइकची किंमत 1,050 रुपयांनी वाढवली आहे.

Apache RTR 200 4V इंजिन-
कंपनीच्या या बाइकमध्ये 199.5 cc सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिव 8,500 rpm वर 20.2 bhp ची पॉवर आणि 7,500 rpm वर 16.8 Nm टॉर्क निर्माण करतं. यासोबत 5-स्पीड गिअरबॉक्स आणि एक स्लिपर क्लच आहे. सस्पेन्शनसाठी एक टेलिस्कॉपिक फॉर्क्स अप फ्रंट आणि रिअरमध्ये एक मोनोशॉकसोबत डिस्क ब्रेक्स आहेत. बाइकमध्ये ड्युअल-चॅनल ABS स्टँडर्ड फीचर असून BS6 Apache 200 4V ब्लॅक आणि व्हाइट शेड्समध्ये येते.

Apache RTR 200 4V स्पेसिफिकेशन्स-
Apache RTR 200 4V मध्ये कंपनी एक डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोलसोबत एक रेस टेलिमेट्री, स्टाइलिश स्प्लिट सीट्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह क्रॅश अलर्ट, लीन अँगल मोड, एक नवीन हेडलँप आणि नवीन ग्रफिक्स दिले आहेत. इंस्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये 0-60 टाइमर, टॉप स्पीड रेकॉर्डरसह बाइकबाबतची विविध माहिती मिळते. या बाइकमध्ये रेसिंग ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे.

Apache RTR 200 4V किंमत –
यापूर्वी Apache RTR 200 4V ची एक्स-शोरुम किंमत 1लाख 27 हजार 500 रुपये होती. तर लाँचिंगच्या वेळी कंपनीने या बाइकची किंमत 1.24 लाख रुपये (एक्स शोरूम) ठेवली होती. ही किंमत बाइकच्या BS4 मॉडेलपेक्षा जवळपास 12,000 रुपयांनी जास्त होती. या अतिरिक्त किंमतीसोबत अपडेटेड Apache RTR 200 4V मध्ये एक BS6 इंजिन, एक नवीन हेडलँप आणि नवीन ग्रफिक्स मिळतात. टीव्हीएसने Apache RTR 200 4V च्या किंमतीत मे महिन्यात 2,500 रुपये वाढ केली होती. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा या बाइकची किंमत वाढवली आहे. त्यामुळे आता ही बाइक खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1 लाख 28 हजार 550 रुपये(एक्स-शोरुम) मोजावे लागतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 1:17 pm

Web Title: bs6 tvs apache rtr 200 4vs price in india increased check details sas 89
Next Stories
1 चार रिअर कॅमेऱ्यांसह 5,020mAh ची बॅटरी, Xiaomi च्या नवीन फोनची किंमत 10 हजारांपेक्षा कमी
2 Oppo Reno 4 Pro चा आज पहिलाच ‘सेल’, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
3 स्वस्त Realme C11 खरेदी करण्याची आज संधी, कमी किंमतीत शानदार फीचर्स
Just Now!
X