सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने जे ग्राहक कॉलिंगपेक्षा इंटरनेट डेटाचा वापर अधिक करतात अशांसाठी एक भन्नाट प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दिवसाला 2GB डेटा मिळणार आहे. सध्या अधिक वैधता असलेले ‘डेटा-ओन्ली प्लॅन’ (केवळ इंटरनेट डेटा प्लॅन) उपलब्ध करणारी बीएसएनएल एकमेव कंपनी आहे.

बीएसएनएल खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवीन प्लान लाँच करत आहे. या यादीत आता ४९ रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे. हा स्पेशल टॅरिफ व्हाऊचर (STV-49) प्लान बीएसएनएलने नुकताच लाँच केला आहे. बीएसएनएलने या प्लॅनला मर्यादीत वेळेसाठी लाँच केले आहे. बीएसएनएल क्रमांक फक्त अॅक्टिव ठेवण्या ग्राहकांना हा प्लॅन बेस्ट आहे. प्लानची किंमत फार नाही. तसेच इमरजन्सी मध्ये डेटा किंवा कॉलिंगची गरज पडल्यासही फायदाचा ठरु शकतो.

४९ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाऊचर या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे डेटासोबतच १०० मोफत मिनिटंही कंपनीनं दिली आहे. मोफत मिनिटं संपल्यानंतर प्रति मिनिट ४५ पैसे दराने चार्ज केले जाते. तसेच १०० एसएमएसही मोफत मिळणार आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानला अॅक्टिवेट करण्यासाठी सेल्फकेयर कीवर्ड ‘STV COMBO 49’ असे आहे.