News Flash

BSNL चा नवीन ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन, 90 दिवस दररोज मिळेल 5GB डेटा

'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या युजर्ससाठी शानदार प्लॅन...

करोना व्हायरस लॉकडाउनमुळे ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. अशातच सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या आपल्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन आणला आहे.

बीएसएनएलने प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन 599 रुपयांचं वर्क फ्रॉम होम स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STV) आणलं असून यामध्ये युजर्सना दररोज 5 जीबी डेटा वापरण्यास मिळेल. कंपनीने 90 दिवसांच्या वैधतेसह हा नवीन 599 रुपयांचा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन आणला आहे. यामध्ये फ्री व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएसचा फायदा मिळतो. देशभरातील कोणत्याही नेटर्कवर कॉलिंगसाठी दररोज 250 मिनिटे मिळतात.

याशिवाय, दररोज 5 जीबी डेटा वापरण्यास मिळतो. म्हणजे 90 दिवसांसाठी एकूण 450 जीबी डेटा ग्राहकांना या प्लॅनमध्ये मिळतो. तर, दिवसाचं डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 80 Kbps इतका मिळेल. गेल्या वर्षीही बीएसएनएलने 599 रुपयांचा प्रीपेडस प्लॅन आणला होता. अनलिमिटेड कॉलिंगसह त्या प्लॅनची वैधता तब्बल 180 दिवस होती. पण तो प्लॅन फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोनच राज्यात उपलब्ध होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 5:01 pm

Web Title: bsnl new work from home plan rs 599 prepaid recharge with 5gb daily high speed data unlimited voice calls for 90 days sas 89
Next Stories
1 गॅस सिलेंडर वापरताना ‘ही’ घ्या दक्षता
2 निती आयोगाच्या सीईओंनी केली Zoom आणि JioMeet ची तुलना , म्हणाले…
3 तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लाइफ दोन तासांनी वाढणार, Chrome च्या नव्या अपडेटमध्ये होणार फायदा
Just Now!
X