24 September 2020

News Flash

न्यारी न्याहारी : पोळीच्या नूडल्स

या पाककृतीत घरातले उरलेले चीज, पनीरसुद्धा खपून जाईल.

साहित्य

उरलेल्या पोळ्या, तेल, सिमला मिरची, गाजर, कोबी, कांदा पात, आले-लसूण ठेचून, एखादा सॉस (घरात असेल त्याप्रमाणे सोया किंवा चिली किंवा टोमॅटो किंवा शेजवान यापैकी एक किंवा मिश्र सॉस), मीठ.

कृती

साधारण नूडल्ससारखे दिसतील असे पोळ्यांचे लांबट तुकडे कात्रीने कापून घ्या. भाज्यांचेही पातळ आणि लांबट काप काढून घ्या. तेल तापवून त्यात ठेचलेले आले लसूण घाला. त्यावर भाज्या परता. त्यावर जे असतील आणि आवडतील असे सॉस घालून छान परतून घ्या. भाज्या बऱ्यापैकी शिजल्यानंतर त्यात पोळीचे लांबट तुकडे म्हणजे आपल्या भाषेत नूडल्स घाला. शेवटी थोडं मीठ वरून भुरभुरा. सगळे मिश्रण पुन्हा परतून घ्या. गॅसवरून उतरून गरमागरम खायला घ्या. या पाककृतीत घरातले उरलेले चीज, पनीरसुद्धा खपून जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2018 1:27 am

Web Title: chapati noodles recipe breakfast recipes
Next Stories
1 ताणमुक्तीची तान : प्रत्येकाशी प्रेमाची वागणूक
2 सेल्फ सव्‍‌र्हिस : एसीची देखभाल
3 नवलाई : आसूसचा ‘झेनबुक फ्लिप एस’
Just Now!
X