आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की, सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची हीच ती वेळ आहे. लॉकडाऊनदरम्यान भारतातील लोक दैनंदिन जीवनात अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने वावरत असल्याचे आढळते; विशेषतः घरपोच डिलिव्हर केलेले खाद्यपदार्थ हाताळण्याबाबत ते अधिक दक्षता बाळगत असल्याचे दिसून येते. आपापल्या घरी विविध ऑनलाइन विक्रेत्यांकडून किराणा माल व रेस्टॉरंट्समधून खाद्यपदार्थ घरपोच मिळत असल्याची अनेकांना सवय झाली आहे. परंतु, अलीकडील वाढत्या कोव्हिड-19 संबंधित घडामोडी लक्षात घेता, आपण ऑनलाइन वस्तू विकत घेताना अधिक जागृत झालो आहोत. गेल्या काही आठवड्यांपासून अनेकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे, आपल्या घरी डिलिव्हर केलेले खाद्यपदार्थ हाताळताना नेमकी कशाप्रकारे दक्षता घ्यावी?

खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी झाल्यानंतर धोकादायक कोरोना व्हायरसची लागण रोखण्यास, खाद्यपदार्थांचे पॅकेज हाताळताना विशिष्ट प्रकारची दक्षता घेणे आवश्यक आहे. हा व्हायरस खाद्यपदार्थांच्या पॅकेजमधून किंवा डिलिव्हरी कर्मचार्‍यांच्या संपर्कात आल्याने पसरू शकतो, असा अनेकांचा समज आहे. सध्याच्या घडामोडी पाहता, कोरोनाव्हायरस हा संसर्गजन्य आजार माणसांच्या संपर्कात आल्याने पसरतो, असे आरोग्य तज्ञांनी स्पष्ट केले आहे. शिवाय आजवर खाद्यपदार्थांच्या पॅकेजद्वारे हा व्हायरस पसरल्याचा पुरावा नसल्याचे आढळते.

डिलिव्हर केलेले खाद्यपदार्थ घरात घेताना ग्राहकांनी खलीलप्रमाणे सूचना ध्यानात ठेवाव्यात.

कृपया हे वाचा

खाद्यपदार्थ ऑनलाइन ऑर्डर करण्याचा जर तुमचा विचार असेल तर, विविध फूड डिलिव्हरी ॲप्स व कंपन्या कशाप्रकारे दक्षता घेत आहेत हे जाणून घ्या. दारोदारी खाद्यपदार्थ पोहचवणार्‍या विविध कंपन्या कॉन्टॅक्ट-लेस डिलिव्हरी (म्हणजे कमीतकमी स्पर्श होईल याची काळजी घेऊन केलेली डिलिव्हरी) करतात. शिवाय ते न चुकता डिलिव्हरी कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आयोजित करतात व कठोर स्वच्छता मानकांचे पालन करतात. मोठ्या प्रमाणावर अन्न दूषित होऊ नये याची खात्री करून घेण्यास, या कंपन्यांनी सुरक्षिततेसाठी कोणकोणत्या गोष्टी अवलंबल्या आहेत हे जाणणे महत्त्वाचे आहे. तुम्हीदेखील सतत मिळणार्‍या खात्रीपूर्वक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी सतर्क रहा. चला, तर महत्त्वाच्या सूचना जाणून घेऊया.

ग्राहकांचे ग्राहकहीत

सध्याच्या परिस्थितीत खाद्यपदार्थांच्या घरपोच डिलिव्हरीदरम्यान विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. कोरोनाबाधित व्यक्तींपासून खाद्यपदार्थांसंबंधित वस्तू दूषित होऊ नयेत यासाठी ग्राहकांनी विशिष्ट दक्षता बाळगावी.

ग्राहकांनी कॉन्टॅक्ट-लेस डिलिव्हरीची सुविधा पुरवणार्‍या कंपन्यांना प्राधान्य द्यावे. खाद्यपदार्थ ऑनलाइन ऑर्डर करताना विविध फूड डिलिव्हरी ॲप्स ही सुविधा उपलब्ध करून देतात. तुम्हाला जर डिलिव्हरी कर्मचार्‍यांना टिप देण्याची इच्छा असेल, तर त्यांच्या हातात पैसे देण्याऐवजी, ऑनलाइन पैसे भरताना ॲपवरच त्यांना टिप द्यावी. ‘कॅश ऑन डिलिव्हरी’, अर्थात हातात पैसे देणे शक्यतो टाळावे. जमल्यास फूड डिलिव्हरी कर्मचार्‍यांसाठी सॅनिटायजर ठेवल्यास, अगदी उत्तम.

फूड पॅकेज घरी आल्यावर ते त्वरित एका स्वच्छ भांड्यात घालून पॅकेज कचर्‍याच्या कुंडीत टाकून द्यावे. हातात ग्लोव्ह्ज घालूनच फूड पॅकेज हातात घ्यावे व आपल्या घरातील स्वच्छ ठिकाणी ठेवावे. अधिकाधिक सुरक्षितता बाळगण्यास, खाद्यपदार्थांचे सेवन करण्याआधी अन्न कमीतकमी 1-2 मिनिटे गॅसवर किंवा मायक्रोव्हेवमध्ये गरम करावे. शिवाय ग्राहकांनी कमीतकमी 20 सेकंद हात साबणाने स्वच्छ धुतल्यावरच खाद्यपदार्थांचा स्वाद घ्यावा.

अशा काही सोप्या सूचनांचे पालन करून तुम्ही घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर केलेल्या चविष्ट पदार्थांचा निश्चिंतपणे स्वाद घेऊ शकता.