पावसाळा हा बाकी कितीही रम्य असला तरीही त्वचेसाठी तो काहीसा कठोरच असतो. कारण, अर्थात या दिवसांमध्ये बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन्सचा धोका तुलनेनं जास्त असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक ठरतं. दरम्यान, आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत खरंतर आपण शक्य तितकी काळजी घेण्याचा प्रयत्न करतच असतो. मात्र, तरीही आपलं एखाद्या लहानशा अवयवाकडे वारंवार दुर्लक्ष होतं. तसेच पावसाळयात शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच आपल्या नखांची स्वच्छता टिकवून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तसं न केल्यास आपल्याला त्याचे प्रतिकूल परिणाम दिसू शकतात. म्हणूनच पावसाळ्यात नखांची स्वच्छता आणि सौंदर्य हे दोन्ही कसं साधायचं? याबाबत आज आपण ५ टिप्स जाणून घेणार आहोत.

) कोरडी ठेवा

आपली नखं ही नेहमी कोरडी राहतील यासाठी विशेष काळजी घ्या. विशेषत: पायांची नखं. पावसाळ्यात आपल्या पायांचा सतत पाण्याशी किंवा अस्वच्छ पाण्याशी संपर्क येत असतो. त्यामुळे ही नखं खराब होण्याची शक्यता अधिक असते. सततच्या दमटपणामुळे या जागी मृत त्वचेच्या पेशी आणि संसर्गजन्य जीवाणू तयार होऊन घाण जमा होते. त्यामुळे, ती जितकी कोरडी राहतील तितकं योग्य. त्याचप्रमाणे, पावसाळयात बाहेर पडताना खुले शूज, फ्लोटर्स किंवा चप्पल घाला. घरी परत आल्यावर पाय स्वच्छ धुवून नखं व्यवस्थित कोरडी करा.

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
summer
सुसह्य उन्हाळा!

) अँटीफंगल पावडर

पावसाळ्यात स्वच्छता राखण्यासाठीच्या अत्यावश्यक गोष्टींमध्ये अँटीफंगल पावडरचा देखील समावेश करा. संसर्ग टाळण्यासाठी दिवसातून एकदा ही पावडर आपल्या नखांवर लावा. अँटीफंगल पावडर नसल्यास त्याऐवजी तुम्ही जेनेरिक टॅल्कम पावडर किंवा स्प्रे डिओडोरंट वापरू शकता.

) ट्रिमिंग

आपली नखं वेळच्यावेळी कापा. कारण लांब नखं ही पाणी आणि आर्द्रतेमुळे सर्व जीवाणूंसाठी एक सुरक्षित जागा बनू शकतात. शिवाय, ओलसरपणामुळे आपली नखं किंचित मऊ देखील होतात. त्यामुळे ती सहज वाकण्याची पर्यायाने मोडण्याची शकता जास्त असते. म्हणून, तुम्ही नख ही लहान आणि सुव्यवस्थित ठेवा.

४) स्वच्छतेसाठी टोकदार साधनं टाळा

नखांच्या आतल्या बाजूच्या स्वच्छतेसाठी अनेक स्त्रिया या लांब आणि टोकदार साधनांचा वापर करतात. मात्र, ही एक चुकीची पद्धत आहे. यामुळे तुमची नखं आणि नखांच्या त्वचेमधलं अंतर वाढू शकतं. पावसाळ्यात ओलाव्यामुळे संसर्गाच्या अनेक समस्या उदभवू शकतात. सोबतच तुमच्या नखांच्या त्वचेला इजा होण्याचा देखील धोका आहेच. म्हणूनच टोकदार साधनं न वापरता स्वच्छतेसाठी तुम्ही नेल ब्रश वापरू शकता.

५) बेस कोट वापरा

नेल पॉलिश लावण्यापूर्वी बेस कोट वापरा. हा लेअर तुमची नखं कमकुवत होण्यापासून रोखेल. तसेच नेल पॉलिश रिमूव्ह करताना नखं आणि क्यूटिकल्स स्मूथ ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचं नेल रिमूव्हर वापरा.