News Flash

फक्त 6750 रुपयांत खरेदी करा Realme चा ट्रिपल कॅमेरा+6000mAh बॅटरीचा स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसोबत 6.5 इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले, शिवाय फिंगरप्रिंट सेन्सरसारखे शानदार फिचर्सही

जर तुम्ही कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर Electronics Sale सुरू असून या सेलमध्ये युजर्स अनेक स्मार्टफोन कमी किंमतीत आणि आकर्षक डिस्काउंटसह खरेदी करु शकतात. 16 तारखेपासून सुरू झालेला हा सेल 20 तारखेपर्यंत आहे. या सेलमध्ये रिअलमी कंपनीचा Realme C12 हा बजेट फोनही स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो. जाणून घेऊया Realme C12 फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि काय आहे ऑफर?

काय आहे ऑफर? :-
सेलमध्ये Realme C12 च्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज मॉडेलला स्वस्तात खरेदी करता येईल. हा फोन लाँच झाला त्यावेळी याची किंमत 8 हजार 999 रुपये होती, तर आता हा फोन 7 हजार 749 रुपयांत खरेदी करता येईल. जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केला तर तुम्हाला फक्त 6 हजार 750 रुपये मोजावे लागतील. कारण सेलमध्ये एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर एक हजार रुपयांपर्यंत सवलतीची ऑफर आहे. याशिवाय फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरही पाच टक्के अनलिमिटेड कॅशबॅकची ऑफर आहे. तसेच, दरमहा 1,417 रुपये नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी ठेवण्यात आला आहे.

Realme C12: स्पेसिफिकेशन्स-
रिअलमी सी12 हा फोन अँड्रॉइड 10 आधारित रिअलमी यूआयवर कार्यरत असून यामध्ये 6.5 इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर या फोनमध्ये असून 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. इनबिल्ट स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवण्याचा पर्याय आहे. शिवाय, फोटोग्राफीसाठी रिअलमी सी12 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (13MP + 2MP + 2MP) आहे. तर, सेल्फीसाठी यामध्ये 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल. 10 W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली तब्बल 6,000 एमएएच क्षमतेची बॅटरी यामध्ये आहे. शिवाय कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस, माइक्रो युएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. Realme C12 च्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर हे फीचर देण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 3:29 pm

Web Title: flipkart electronics sale 2021 get discount on realme c12 check offer price specifications sas 89
Next Stories
1 BHIM UPI द्वारे पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागतोय? इथे करा तक्रार
2 Reliance Jio च्या ‘सुपर व्हॅल्यू प्लॅन’मध्ये मिळेल 56GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ऑफर्सही
3 16 तास बॅटरी बॅकअप आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्टसह दोन Wireless ईअरबड्स लाँच, किंमत 899 रुपये
Just Now!
X