22 October 2020

News Flash

भारतासह अनेक देशांमध्ये डाउन झालं Gmail , ई-मेल सेंड होत नसल्याने युजर्स त्रस्त

गुगलच्या 'जीमेल'चं (Gmail) सर्व्हर डाउन

(संग्रहित छायाचित्र)

गुगलच्या ‘जीमेल’चं (Gmail) सर्व्हर डाउन झालं आहे. परिणामी भारतासह अनेक देशांमध्ये युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक युजर्सना ई-मेल पाठवता येत नाहीयेत. तर, काही युजर्सनी अटॅचमेंट फेल होण्याची तक्रार सोशल मीडियावर केली आहे.

डॉक्युमेंट्स अटॅच करताना येतोय एरर -(Express photo)

जीमेलशिवाय गुगल ड्राइव्हमध्येही युजर्सना समस्या जाणवत आहेत. वापरकर्त्यांना फाइल शेअर करणं, तसंच अपलोड आणि डाउनलोड करणंही कठीण जात आहे. युजर्सनी याबाबत ट्विटर आणि डाउनडिटेक्टर वेबसाइटवर तक्रार केल्यानंतर आता गुगलनेही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. ‘गुगल अ‍ॅप्स स्टेटस पेज’वर याबाबत माहिती देताना, जीमेलमध्ये समस्या जाणवत असल्याच्या तक्रारी मिळाल्या असून लवकरात लवकर समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं गुगलने म्हटलं आहे.

भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, जपान आणि युरोपमधील काही भागांमध्ये युजर्सना ही समस्या जाणवत असल्याचं समजतंय. डाउनडिटेक्टरनुसार, भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजेपासून युजर्सना जीमेलमध्ये समस्या जाणवायला सुरूवात झाली.

ई-मेल पाठवताना आणि फाइल्स अटॅच करताना बहुतांश युजर्सना अडचणी येत आहेत. काही युजर्स गुगल ड्राइव्ह, गुगल डॉक यांसारख्या G suite सेवा वापरतानाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं आहे. पण, सर्वाधिक समस्या जीमेल वापरणाऱ्यांना होत आहे. जगभरात लाखो लोकं जीमेलचा वापर करतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 12:40 pm

Web Title: gmail down users report being unable to send emails and upload attachments sas 89
Next Stories
1 6GB रॅम असलेल्या Realme च्या ‘बजेट’ स्मार्टफोनचा सेल, शानदार ऑफर्सही
2 पाच कॅमेऱ्यांचा ‘बजेट’ स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी, फोनमध्ये आहे 5,020mAh ची दमदार बॅटरीही
3 64 MP कॅमेरा + 5000mAh बॅटरी; मोटोरोलाच्या One Fusion+ चा आज ‘सेल’, जाणून घ्या ऑफर्स
Just Now!
X