News Flash

तातडीने अपडेट करा Chrome, गुगलने दिली ‘वॉर्निंग’

Google Chrome वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी...

Google Chrome वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गुगलने 2 अब्जहून अधिक क्रोम युजर्सना ब्राउजर अपडेट करण्याची सूचना केली आहे. सध्याच्या क्रोम ब्राउजरमध्ये दोन धोकादायक ‘बग’ असल्याने गुगलकडून क्रोम अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे.

एका सायबर सिक्युरिटी फर्मने ब्राउजरमध्ये दोन मोठ्या उणीवा असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर कंपनीने युजर्सना ब्राउजर अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन कंपनीने खबरदारी म्हणून Windows, Mac आणि Linux प्लॅटफॉर्मवरील क्रोम युजर्सना ब्राउजर अपडेट करण्यास सांगितले आहे. 81.0.4044.129 हे क्रोमचे नवीन व्हर्जन अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

येत्या काही दिवसांमध्ये 81.0.4044.129 हे क्रोमचे नवीन व्हर्जन युजर्सच्या सिस्टिममध्ये ऑटोमॅटिकली इंस्टॉल केले जाईल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. Qihoo 360 चे सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट झे जिन (Zhe Jin)यांनी सर्वप्रथम या धोक्याबाबत माहिती दिली. CVE-2020-6462 आणि CVE-2020-6461 नावाचे हे दोन बग use after free मेमरीशी निगडीत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 1:47 pm

Web Title: google issues warning for 2 billion chrome users security threat sas 89
Next Stories
1 YouTube आणतंय नवं फीचर, आता व्हिडिओसह मिळेल शॉपिंगचा पर्याय!
2 झूम कॉलवरच केलं लग्न; पाहुण्यांना आमंत्रण देताना म्हणाले ‘लग्नाला या, पॅण्ट नसली तरी चालेल’
3 ‘क्वॉड कॅमेरा सेटअप’सह ‘पॉवरफुल’ बॅटरी, Redmi Note 9 झाला लॉन्च
Just Now!
X