News Flash

आता गुगल सांगणार कोण करतंय कॉल, नवीन फीचरमुळे TrueCaller ची गरजच नाही

एखादा कॉल आल्यास तो कॉल का करण्यात आला आहे याचं कारणही युजर्सना कॉल उचलण्याआधीच कळेल

आघाडीची सर्च इंजिन कंपनी गुगलने नुकतीच Verified Calls फीचरची घोषणा केली आहे. गुगलचं हे फीचर TrueCaller अ‍ॅपसाठी थेट टक्कर देणारं असेल. या नवीन फीचरद्वारे कोण कॉल करतंय, कॉल करणाऱ्याच्या प्रोफाइलचा लोगो याबाबत माहिती मिळेल. याशिवाय एखादा बिजनेस कॉल आल्यास तो कॉल का करण्यात आलाय, याचं कारणही युजर्सना कॉल उचलण्याआधीच कळेल.

भारतासह जगभरात फ्रॉड कॉल्सची समस्या वाढत असतानाच गुगलने  Verified Calls फीचर आणलं आहे. हे फीचर भारत, स्पेन, ब्राझिल, मेक्सिको आणि अमेरिकासहीत जगभरात रोलआउट केलं जाणार आहे. गुगलच्या पिक्सेल सीरिजच्या सर्व फोनमध्ये आणि अनेक अँड्रॉइड फोन्समध्ये Google Phone अ‍ॅप आधीपासूनच डायलर म्हणून काम करत असतं. त्या सर्व फोनमध्ये हे फीचर पुढील अपडेटपासून मिळेल. जर तुमच्या फोनमध्ये  Google Phone अ‍ॅप इंस्टॉल नसेल तर तुम्ही हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधून इंस्टॉल करु शकतात.

या पायलट प्रोग्रॅमची सुरूवात चांगली राहिली असून युजर्सना या फीचरचा नक्कीच फायदा होईल, असं गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. या फीचरद्वारे कोण कॉल करतंय, कॉल करणाऱ्याच्या प्रोफाइलचा लोगो याची माहिती युजरला मिळेल. सध्या TrueCaller अ‍ॅपमध्ये अशाप्रकारचे फीचर्स युजर्सना मिळतात. पण सुरक्षेच्या कारणास्तवर भारत सरकारने अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, त्यात TrueCaller चाही समावेश आहे.  Verified Calls फीचरद्वारे एखादा बिजनेस कॉल आल्यास तो कॉल का करण्यात आला आहे याचं कारणही युजर्सना कॉल उचलण्याआधीच कळेल. मात्र, कॉल करणाऱ्या बिजनेस कॉलरने Verified Calls साठी गुगलसोबत नोंदणी केली असेल तरच कॉल करण्याचं कारण युजर्सना समजणार आहे. हे फीचर आतापर्यंत TrueCaller अ‍ॅपमध्ये नव्हतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 1:26 pm

Web Title: googles new truecaller like verified calls feature will tell you why a business is calling you sas 89
Next Stories
1 आता फोन मार्केटवरही Jio करणार कब्जा ? लवकरच 10 कोटी स्वस्त 4G स्मार्टफोन करणार लाँच
2 5000mAh बॅटरी; किंमत फक्त 6,799 रुपये ; लेटेस्ट ‘बजेट’ स्मार्टफोनचा ‘सेल’
3 किंमत फक्त 7,499 + 5000mAh बॅटरी, ‘स्वस्त’ स्मार्टफोनवर शानदार ऑफर्स
Just Now!
X