प्रत्येक फळाची एक विशिष्ट चव, वैशिष्ट्य असतं. त्यामुळे अनेकांना आंबा, संत्री, सीताफळ, द्राक्षे अशी फळं आवडतात. प्रत्येक फळामध्ये काही ठराविक गुणधर्म असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. अनेक फळांमध्ये लोह, कॅल्शियम यांची मुबलक मात्रा असते. त्याचप्रमाणे सीताफळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोहाचं प्रमाण असल्याचं दिसून येतं. त्यामुळे सीताफळ हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. म्हणूनच सीताफळ खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. अशक्तपणा दूर होतो.

२. हृदयाशीसंबंधीत समस्या कमी होतात. हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

३. डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

४. सिताफळात लोहचं प्रमाण असल्यामुळे गर्भवती महिलांसाठी फायदेशीर

५. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

६. छातीत किंवा पोटात जळजळत होत असल्यास ती कमी होते.

७. पचनक्रिया सुधारते.