News Flash

डोळ्यांच्या आरोग्यापासून ते वजन नियंत्रणात ठेवण्यापर्यंत अंडी खाण्याचे पाच फायदे

अंडी खाण्याचे ५ महत्त्वाचे फायदे

डोळ्यांच्या आरोग्यापासून ते वजन नियंत्रणात ठेवण्यापर्यंत अंडी खाण्याचे पाच फायदे

निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी आहारात प्रत्येक पदार्थाचा समावेश करणं गरजेचं आहे. पालेभाज्या, कडधान्य, फळे आणि मांसाहार या घटक पदार्थांमधून शरीरासाठी आवश्यक असणारी प्रथिने, कॅल्शिअम मिळत असतात. यामध्येच अंड्यांमध्ये पोषणमुल्यांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अनेकदा डॉक्टरदेखील अंडी खाण्याचा सल्ला देतात. म्हणूनच मानसी जैन यांनी आरोग्यासाठी अंडी कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकतात आणि अंडी खाण्याचे नेमके फायदे कोणते हे सांगितलं आहे.

१. अतिशय उपयुक्त पोषणमूल्ये –
शरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असणारी अनेक जीवनसत्त्वे अंड्यातून मिळतात. अंड्यामध्ये फोलेट म्हणजेच अ, ब १२ ब ५ आणि ब २ ही जीवनसत्त्वे असतात. याबरोबरच फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, ओमेगा ३ आणि इतर अनेक महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे तंदुरुस्तीसाठी दररोज एक अंडे खाणे अतिशय आवश्यक आहे.

२. कोलेस्टेरॉलचे मुबलक प्रमाण –
अंड्यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असले तरीही त्याचा शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. कोलेस्टेरॉलमधील अनेक घटक आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. आहारात अंड्याचा समावेश केला तरीही शरीरावर किंवा रक्तातील कोलेस्टेरॉलवर त्याचा परिणाम होत नाही. विशेष म्हणजे यामुळेच मधुमेह असणाऱ्यांनाही डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला देतात.

३.हृदयरोग कमी होण्यास उपयुक्त
अंडी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. त्यामुळेच हृदयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अंड्यांचा आहारातील समावेश उपयुक्त ठरतो.

४. डोळ्यांसाठी फायदेशीर –
अंड्यामध्ये ल्यूटीन आणि झिझेन्थिन ही दोन अँटी ऑक्सिडंटस असतात. हे दोन्हीही घटक उत्तम दृष्टीसाठी अतिशय आवश्यक असतात. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये हे घटक समाविष्ट असल्याने बलक खाणेही तितकेच गरजेचे असते. मोतीबिंदू आणि रेटिनाच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी हे दोन्हीही अँटी ऑक्सिडंटस आवश्यक असतात.

५. वजन कमी होण्यास मदत
अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने अंडी खाल्ल्यास बराच वेळ भूक लागत नाही. अंड्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि सातत्याने खाण्यावर नियंत्रण येते. त्यामुळे जास्त कॅलरीज निर्माण होत नाहीत तर त्या वापरल्या जातात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 3:52 pm

Web Title: health benefits of eating eggs important tips ssj 93
Next Stories
1 VIDEO : पाॅर्न मुलांपर्यंत पोचतं कसं?… “गोष्ट बालमनाची”
2 नाश्त्याला पोहे खाण्याचे फायदे वाचाल तर दररोज आवडीनं खाल
3 MG Gloster चा नवीन टीझर VIDEO: स्टीअरिंगला हातही न लावता ऑटोमॅटिक पार्क होणारी SUV
Just Now!
X