09 March 2021

News Flash

ब्रेकफास्टसाठी तुम्ही डब्यात नेऊ शकता ‘हे’ पदार्थ

करायला सोपे आणि आरोग्यदायी

ऑफीसला जाताना डबा न्यायला अनेकांना कंटाळा येतो. त्यातही जेवणाचा असेल तर ठिक पण नाश्ता किंवा संध्याकाळच्या खाण्याचा डबा न्यायला अनेक जण कंटाळा करतात. मात्र भूक लागली की बाहेरचे काहीतरी खाण्यापेक्षा किंवा चहा-कॉफी घेऊन पोट भरण्यापेक्षा आपल्याकडे पौष्टीक आणि पोटभरीचे काही असेल तर ते कधीही चांगले. घाईच्यावेळात प्रवासादरम्यान किंवा अगदी ऑफीसमध्ये बसूनही सहज खाता येतील असे काही हटके पदार्थ…

 

१. एनर्जी बार – हे बार ऑफीसमध्ये सोबत न्यायला अतिशय सोपे असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रथिनांचा समावेश असून कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असते. यामध्ये साखर आणि पदार्थ टिकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांचे प्रमाण कमी असते. यामध्ये ओटस, खजूर, मध याबरोबरच सुकामेवा असल्याने ते चविष्ट तर लागतेच पण त्याने पोटही भरते. बाजारात हे स्नॅक बार म्हणून उपलब्ध असतात. ते घरीही बनवता येऊ शकतात.

२. कडधान्याचे चाट – हे अतिशय सर्वोत्तम अन्न आहे. यामध्ये कोणतेही एक कडधान्य किंवा एकत्रित कडधान्ये घेऊ शकता. त्यावर कांडा, टोमॅटो, काकडी आणि कोथिंबीर व लिंबू हे घालून घ्यावे. यामुळे ही भेळ चविष्ट लागते. चाटमसाला, मिरपूड आणि मीठ घातल्यास आणखी चांगली चव येते. हा स्नॅक्स तुम्ही सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळी कधीही खाऊ शकता.

३. मिक्स फ्रुट सॅलाड – यामधून नैसर्गिक खनिजे आणि जीवनसत्त्वे मिळतात. यामध्ये आपल्या घरात उपलब्ध असणारी सगळी फळे घालू शकता. सफऱचंद, केळी, पपई ही फळे साधारणतः सगळ्या सिझनमध्ये उपलब्ध असतात. इतर फळे सिझनप्रमाणे वापरावीत. ही सगळी फळे एकत्र खाण्यास छान लागतात. त्यांची आंबट गोड चव आणि त्यावर चाटमसाला असेल तर उत्तम. यामुळे पोटही भरते.

४. ओटस आणि व्हेज पॅनकेक – पिठापासून बनवलेले पॅनकेक हे आरोग्यासाठी म्हणावे तितके चांगले नसतात. त्यापेक्षा ओटस आणि भाज्यांपासून बनवलेले पॅनकेक जास्त हेल्दी असतात. प्रथिने आणि फायबर यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असलेले हे पॅनकेक आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात. हे पॅनकेक घरात अतिशय कमी वेळात चविष्ट बनवता येतात आणि डब्यात नेण्यासाठीही सोपे असतात. मटार, गाजर, ढोबळी, बीट, कोबी यांसारख्या भाज्या यामध्ये घातल्यास ते आरोग्यदायी ठरतात.

५. व्हेज पनीर सॅंडविच – सॅंडविटच बनवायला अतिशय सोपा असा पदार्थ आहे. यामध्ये संपूर्ण गव्हाचा किंवा ब्राऊन ब्रेडचा वापर करु शकता. यात काकडी, कांदा आणि टोमॅटोच्या स्लाईसचा वापर करावा. तसेच वरती पनीरचे टाकावे. यातून शरीराला आवश्यक असणारी खनिजे, कॅल्शिअम आणि जीवनसत्त्वे मिळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 7:32 pm

Web Title: healthy and delicious snacks easy to carry in tiffin
Next Stories
1 आहार आणि स्वभाव यांचा संबंध तुम्हाला माहितीये?
2 गर्भधारणेत उच्च स्निग्धांशयुक्त आहार घेणे अपायकारक
3 आरोग्यदायी जीवनशैलीने आयुष्यमानात वाढ
Just Now!
X