तुम्ही अद्याप तुमचे आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक केले नसेल तर तुम्हाला दिलासा देणारी बातमी आहे. मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या संसदीय समितीने आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करण्यासंदर्भात आज एक महत्वपूर्ण निर्णय दिला. आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करण्याची शेवटची तारीख ६ फ्रेब्रुवारी २०१८ वरून वाढवून ३१ मार्च २०१८ करण्यात आली आहे. दरम्यान, ८ डिसेंबरला सरकारने आधारला पॅन कार्डशी लिंक करण्याची अखेरची मुदत वाढवून ती ३१ मार्च २०१८ केली आहे.

गुरूवारीच केंद्र सरकारने बँक खात्याशी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची ३१ डिसेंबरची मुदत मागे घेतली. अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागाने यासंबंधीचे परिपत्रक काढले असून पुढील मुदत चर्चेअंती ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे.

जाणून घ्या कशाप्रकारे आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करता येईल

तुमचे सीमकार्ड ज्या कंपनीचे असेल त्या कंपनीच्या मोबाईल गॅलरीला भेट द्या. तिथे तुमच्या अंगठ्याचे ठसे घेऊन तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करुन देण्यात येईल. जर तुम्ही वापरत असलेला क्रमांक तुमच्या नावावर नसेल तर ज्याच्या नावावर ते सीमकार्ड आहे त्यांना गॅलरीत सोबत नेऊन फिंगरफ्रिंटच्या सहाय्याने आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करुन घ्यावे

त्यानंतर तुम्हाला रि-व्हेरिफिकेशनसाठीची माहिती द्यावी लागेल. ती माहिती दिल्यानंतर तुमच्या क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला मदत करणाऱ्या त्या एक्झीक्युटीव्हला सांगावा. ते तुमचा ओटीपी सिस्टीमध्ये व्हेरिफाईड करतील.

त्यानंतर २४ तासांनी सर्व्हिस प्रोव्हायडर तुमचा नंबर व्हेरिफाय करतात. कंपनीकडून व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुमच्या क्रमांकावर एक व्हेरिफिकेशन नंबर पाठवण्यात येईल ज्याला तीन तासात उत्तर देणे बंधनकारक असते.

या व्हेरिफिकेशन मेसेजला उत्तर देण्यासाठी RV < स्पेस > Y लिहून १२३४५ वर पाठवावा लागेल. त्यानंतर तुमचे आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक होईल.