करोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे. या महामारीमध्ये प्रत्येक जण एका योध्याप्रमाणे लढत आहे. या वातावरणातच भारतीय रेल्वेनं ५६१ पदांची भरती जाहीर केली आहे. ईस्ट कोस्ट रेल्वेने विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट, हॉस्पिटल अटेंडेट या पदांचा समावेश आहे. यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट २५५ जागा, फार्मासिस्टसाठी ५१ जागा आणि हॉस्पिटल अटेंडेट, ओटीए, ड्रेसर या पदांसाठी २५५ जागा आहेत.

या पदांसाठी इच्छुक उमेदवार २२ मे २०२० पर्यंत अर्ज दाखल करु शकतात. महत्वाचं म्हणजे उमेदवारांची निवड मेरिट लिस्टनुसार केली जाईल. या भरतीत विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे १२ पास उमेदवारही अर्ज दाखल करु शकतात.

pune sassoon hospital marathi news
पुणे: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ससूनमध्ये अधीक्षकांचे ‘खुर्चीनाट्य’
nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
in nagpur Suicide attempt by young man due to family reasons police save him
कौटुंबिक कारणातून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, पण देवदुतासारखे धावून आले पोलीस; दरवाजा तोडून…
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया

नर्सिंग सुपरिटेंडेंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० वर्ष असायला हवे तर फार्मासिस्टसाठी १८ आणि हॉस्पिटल अटेंडेट, ओटीए, ड्रेसरसाठी ३५ वर्षांपर्यंतचा उमेदवार अर्ज करू शकतो. अर्जदार ऑनलाइन अर्ज भरून srdmokhur@gmail.com. या मेल याआडीवर पाठवावे लागेल