News Flash

जाणून घ्या कसे पाठवायचे whatsapp stickers

इमोजीव्यतिरिक्तही वेगळे आणि आकर्षक असे हे स्टिकर्स असणार आहे.

व्हॉट्स अॅप हे केवळ मेसेजिंग अॅप राहिलं नसून त्याचा वापर करून आपण व्हिडिओ, व्हॉइस कॉल करू शकतो, पैसे पाठवू शकतो. मात्र इतर मेसेजिंग अॅपच्या तुलनेत व्हॉट्स अॅपमध्ये काही फीचर्स कमी आहेत. हेच हेरून व्हॉट्स अॅपनं आता आणखी एक फीचर आणलं आहे. हे फीचर म्हणजेच whatsapp stickers होय. इमोजीव्यतिरिक्तही वेगळे आणि आकर्षक असे हे स्टिकर्स असणार आहे. या स्टिकर्सचा कसा वापर करायचा हे पाहुयात

– व्हॉट्स अॅप बिटा व्हर्जनवर हे स्टिकर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे हे स्टिकर्स वापरायचे असतील तर व्हॉट्स अॅप अपडेट करणं गरजेचं आहे.

– व्हॉट्स अॅप अपडेट केल्यानंतर चॅट विंडोमध्ये सर्वात शेवटी असणाऱ्या इमोजीच्या आयकॉनवर क्लिक करावं. त्यानंतर इमोजीची विंडो ओपन होईल. सर्वात खाली इमोजी, जीआयएफ असे पर्याय असतील यात सर्वात शेवटचा पर्याय हा ‘व्हॉट्स अॅप स्टिकर्स’चा असणार आहे.

– यात काही स्टिकर्स हे देण्यात आले आहेत. ते आपण पाठवू शकतो.


– याव्यतिरिक्त स्टिकर्सच्या बाजूला असणाऱ्या प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर युजर्सना हे वेगवेगळे स्टिकर्स हे डाऊनलोडही करता येणार आहेत.


– ‘my stickers’ मध्ये डाऊनलोड केलेले सगळे स्टिकर्स सेव्ह होणार आहेत. हे स्टिकर्स नको असल्यास ते डिलीट करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.

 

याव्यतिरिक्त आपण स्वत: स्टिकर्स तयारही करू शकतो. मात्र स्वत:चे स्टिकर्स तयार करण्यासाठी युजर्सला एक अॅप डाऊनलोड करावं लागले. यासाठी प्लेस्टोअरमध्ये काही अॅप उपलब्ध असून याद्वारे तयार करण्यात आलेला स्टिकर्स डायरेक्ट आपण व्हॉट्स अॅपवरही पाठवू शकतो.

दिवाळीनिमित्त खास आपण हे स्टिकर्स पाठवू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 12:46 pm

Web Title: how to create stickers for whatsapp
Next Stories
1 Video : इशा अंबानीच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का ?
2 जिंकलंस ! ‘या’ कारणामुळे रिक्षाचालकावर कौतुकाचा वर्षाव
3 अभिमानास्पद ! नक्षलग्रस्त भागातील मुलगी एका दिवसासाठी झाली ऑस्ट्रेलियाची राजदूत
Just Now!
X