विविध बँकामध्ये लिपिक पदाच्या १२,०७५ जागांची भरती आयबीपीएसमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे बंधनकारक आहे. एक सप्टेंबर २०१९ रोजीपर्यंत २० वर्ष पूर्ण असणारा आणि २८ वर्ष पूर्ण असणारा व्यक्ती आवेदन करू शकतो. एससी आणि एसटीसाठी वयामध्ये पाच वर्षे सुट देण्यात आली आहे. तर ओबीसीमधील आवेदनकर्त्यांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.
एससी आणि एसटीमधील विद्यार्थांना १०० रूपये आवेदन शुल्क असेल तर इतरांना सहाशे रूपये शुल्क भरून अर्ज करता येईल. लिपिक पदासाठी घेण्यात येणारी पूर्व परीक्षा 07,08,14 आणि 21 डिसेंबर 2019 या तारखेला घेतली जाईल. यातून उत्तीर्ण होणाऱ्या परिक्षार्थांची मुख्य परीक्षा 19 जानेवारी 2020 रोजी होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर उपलबद्ध आहे. यासाठी ऑनलाइल अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2019 पर्यंत आहे.
जाहीरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्यासाठी क्लिक करा