News Flash

तेच तेच काढे पिऊन कंटाळा आला असेल तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ही रेसिपी ट्राय करा

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तोच तोच काढा पिऊन कंटाळा आला असेल तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकरीता ही खास रेसिपी एकदा ट्राय कराच

हळदीयुक्त लिंबूपाणी प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते.

गेल्या दीड वर्षांपासून करोनाने थैमान घातलंय. या कालावधीमध्ये आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनीच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे काढे बनवून प्यायलेत. तर दुसरीकडे रोगप्रतिकारशक्ती वाढण्याकरिता आहारात स्वयंपाक घरातील मसाल्यांपासून ते व्यायामपर्यंत प्रत्येकाने आपल्या जीवनशैली प्रमाणे सवयी बदलेल्या आहेत. मात्र आता तेच तेच काढे पिऊन कंटाळा आला असेल तर शेफ सारांश गोइला यांनी रोगप्रतिकार शक्ती वाढण्याकरिता छान चटकदार अशी हळदीयुक्त लिंबूपाणी रेसिपी शेअर केली. नक्की काय आहे ही रेसिपी आणि त्याचा काय फायदा होणार जाणून घेऊयात.

शेफ सारांश गोइला यांनी एक मस्त असा उपाय सांगितलंय, तो म्हणजे ज्यांना काढा प्यायला आवडत नसेल त्यांनी हळदीयुक्त लिंबू पाणी पिऊन आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवावी.

हळदीयुक्त लिंबूपाणी बनवताना हळदीचा कडवटपणा संतुलित करण्यासाठी लिंबू व मधाचा वापर करा. कारण हळद ही शरीरात उष्णता निर्माण करते. त्याचबरोबर काळ्या मिरीमधील उष्णता हळद पूर्णपणे शोषून घेण्यास मदत करते. हळद टाकलेलं लिंबू पाणी बरेच दिवस टीकतं. त्यामुळे एकाच वेळी ६ ते ८ ग्लास हळदीयुक्त लिंबू पाणी बनवून फ्रिजमध्ये ठेवता येतं.

हळदीयुक्त लिंबूपाणी बनवण्याची कृती:

  • आवडीप्रमाणे हे हळदयुक्त लिंबूपाणी गोड किंवा थोडंसं तिखट देखील बनवू शकता. यासाठी घरगुती वापरातील हळद चालते. किंवा ओली हळद असेल तर ती थोड्या कमी प्रमाणात घ्यावी
  • या विशेष सरबतामध्ये टाकण्यासाठी लिंबू नसेल तर आवळा वापरू शकता.

साहित्य:

चिरलेली दोन छोटी ताजी हळद किंवा हळद पावडर
१ टी स्पून – आले
१ टी स्पून – भाजलेला जिरे
१ टी स्पून – काळे मीठ
२ टी स्पून – मिरपूड
४ चमचे – मध
२ टीस्पून – गुलाबी मीठ
४ – लिंबू (रसयुक्त)

पद्धत:

वरील सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये ब्लेंड करा. बारीक पेस्ट बनवा. आता या पेस्ट मध्ये १५० मिली पाणी मिसळवून छान मस्त इम्युनिटी बुस्टरचा आनंद घ्या.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 10:20 am

Web Title: immunity booster haldi nimbu pani to make your system happy scsm 98
Next Stories
1 नियोजन आहाराचे : आहार गवंडीकाम करणाऱ्यांचा
2 पावसाळ्यातील आहार
3 त्वचारोगासाठी फोटोथेरपी