Sherco TVS Rally Factory Team ने  ‘डकार रॅली 2020’ साठी आपला चार रायडर्सचा संघ जाहीर केला. ही रॅली 5 ते 7 जानेवारी 2020 दरम्यान सौदी अरेबियात होणार आहे. TVS MotoSoul 2019 मध्ये याची घोषणा करण्यात आली. टीममध्ये रेसर मायकेल मेटगे (फ्रान्स), एंड्युरो चॅम्पियन लोरेन्झो सँटोलिनो (स्पेन) आणि जॉनी ऑबर्ट (फ्रान्स) व भारताचा रायडर हरिथ नोहा याचाही समावेश आहे. याद्वारे हरिथ नोहा डकार रॅलीमध्ये पर्दापण करत आहे. शेरको-टीव्हीएस फॅक्टरी टीमने 2019 मध्ये सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भरीव यश मिळवले होते व त्यात मेरझोगा रॅली, डेझर्ट स्टॉर्म रॅली, बाजा अरागॉन रॅली यांचा समावेश असून डकार 2020 मध्येही चांगल्या कामगिरीसह सांगता करण्यासाठी टीम उत्सुक आहे.

डकार 2020 ही आंतरराष्ट्रीय रॅली- रेडची 42 वी आवृत्ती असून ती सौदी अरेबियाच्या वाळवंटात होणार आहे. हा अज्ञात ठिकाणं, अनपेक्षित आव्हानं, अपरिचित कहाण्या आणि अविश्वसनीय क्षणांचा प्रवास असेल. जेदाहमध्ये याची सुरुवात होऊन रियाधद्वारे अल किद्दियामध्ये सगळे एकत्र येतील. शेरको टीव्हीएस फॅक्टरी टीमचे रॅलीमध्ये सहभागी होण्याचे हे सहावे वर्ष आहे. 2006 पासून टीव्हीएस रेसिंग टीमचा भाग असलेले भारतीय रायडर आणि डकार 2019 पूर्ण करणारे अरविंद केपी यांना या वर्षाच्या सुरुवातीला सराव सत्रामध्ये पायाला दुखापत झाली व त्यामुळे ते डकार रॅली 2020 मध्ये सहभागी होणार नाहीत. केपी यांनी डकार 2019 यशस्वीपणे पूर्ण केली असून ही अतिशय कठीण रॅली पूर्ण करत 37 वे स्थान मिळवणारे ते एकमेव भारतीय आहेत.

कशी आहे टीम –

शेरको-टीव्हीएस रॅली फॅक्टरी टीमचे आघाडीचे रायडर मायकेल मेटगे यंदाच्या या कठीण रॅलीमधे सातव्यांदा सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत आणि लोरेन्झो सँतोलिनो डकार रॅलीमध्ये दुसऱ्यांदा सहभागी होत आहेत. डकार 2018 मध्ये सहाव्या स्थानावर आलेल्या जॉनी ऑबर्ट यांना रेसिंगचा 35 वर्षांचा अनुभव आहे. तर, चौथा रायडर हरिथ नोहा भारतातील सर्वात गुणवान रायडर्सपैकी एक असून त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय रॅलीजमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

शेरको-टीव्हीएस रॅली फॅक्टरी टीमबद्दल –
2015 मध्ये डकार रॅलीमध्ये शेरकोबरोबर भागिदारीत सहभागी झालेली टीव्हीएस रेसिंग ही पहिली भारतीय फॅक्टरी टीम ठरली. दोन्ही टीम्सना बाइक्सचा प्रचंड ध्यास असून तेव्हापासून ते मोटरस्पोर्ट्समधील जागतिक ब्रँड ठरले आहेत. एकत्रितपणे ते रेसर्सना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण आणि तंत्रज्ञांना रेसिंग तंत्रज्ञानाविषयीचे ज्ञान देत असल्यामुळे त्यांची सातत्याने प्रगती होत आहे. वर्षभरात टीम रॅली ऑफ मोरोक्के, बाजा अरागॉन, मेरेझोगा रॅली आणि डकार रॅलीमध्ये सहभागी होतात. टीमने नुकतीच स्पेनमध्ये झालेली बाजा अरागॉन रॅली 2019 जिंकली आहे.

टीव्हीएस रेसिंगबद्दल –
गेल्या 37 वर्षांपासून टीव्हीएस रेसिंग रोड रेसिंग, सुपर क्रॉस, मोटोक्रॉस, डर्ट ट्रॅक्स, रॅली अशा ऑन- ऑफ रोड रेसिंग उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे. 2015 च्या सुरुवातीला टीव्हीएस रेसिंग डकार रॅलीसारख्या जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या आणि कठीण रॅलीमध्ये सहभागी झालेली पहिली भारतीय फॅक्टरी टीम ठरली. टीव्हीएस रेसिंगने गेल्या वर्षी सुपरक्रॉस, रॅलीज आणि रोड रेसिंग अशा सर्व प्रकारच्या दुचाकी मोटरस्पोर्टमध्ये 15 चॅम्पियनशीप्स जिंकल्या आहेत.