News Flash

लहान मुलांना रमवा या रंजक खेळात

बौद्धिक विकासासाठीही उपयुक्त

लहान मुलं घरात असली की त्यांना कोणत्या अॅक्टिव्हीटीमध्ये गुंतवायचे हा एक मोठा प्रश्नच असतो. झोप, खेळणे, गप्पा मारणे अशा सगळ्या गोष्टी करुन झाल्यावर त्यांच्यासोबत काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. कधी त्यांना चित्रं काढायला देणं तर कधी एखादी गोष्ट सांगणं इतकंच आपण आई-वडील म्हणून किंवा आजी-आजोबा म्हणून करु शकतो. पण त्यांना डोक्याला ताण देणारी आणि त्यासोबत त्यांचा विकास होईल अशी एखादी गोष्ट केल्यास ती नक्कीच फायदेशीर ठरु शकते. पाहूयात असाच एक सोपा आणि लहानग्यांना आवडेल असा खेळ.

जिओचा ‘आयफोन X’ २६,७०० रुपयांना, पण…

दोन जण किंवा अगदी १५ ते २० जण खेळू शकतात असा खेळ. सुरुवातीला एकाने एक शब्द सांगायचा आणि मग त्याच्याशी निगडीत शब्द इतरांनी सांगायचे. उदा. तहान- पाणी – नदी- जलवाहतूक- बोट- हात -पाय-शरीर यांमुळे मुलांना अनेक नवीन शब्द समजतात. तसेच त्यांची शब्दांची उजळणीही होते. एखादा माहिती नसलेला शब्द असेल तर तोही माहिती होतो. यामुळे मुलांची भाषा सुधारण्यास मदत होते. हा खेळ इंग्रजी शब्दांमध्येही खेळता येतो. तुमच्याकडे आजुबाजूची मुले आली असल्यास त्यांनाही या खेळात समाविष्ट करुन घेतल्यास मुले चांगल्या पद्धतीने रमतात.

वासंती काळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2017 5:16 pm

Web Title: indoor game for children easy useful for improving language as well
Next Stories
1 ताण दूर करण्यासाठी ‘हे’ चार उपाय करून पाहा
2 ‘हे’ आहेत एअरटेलचे नवीन आकर्षक प्लॅन्स
3 जिओचा ‘आयफोन X’ २६,७०० रुपयांना, पण…
Just Now!
X