28 February 2021

News Flash

कमी किंमतीत शानदार फीचर्स, या ‘स्वस्त’ स्मार्टफोनचा भारतातील पहिलाच ‘सेल’

तब्बल 6000mAh क्षमतेच्या बॅटरीसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप...

Infinix ने गेल्या आठवड्यातच आपला नवीन भारतात आपला नवीन लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Infinix Smart 4 Plus लाँच केला. त्यानंतर आज(दि.28)  पहिल्यांदा हा फोन विक्रीसाठी सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यासाठी इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर दुपारी 12 वाजेपासून सेलला सुरूवात झाली आहे. तब्बल 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी आणि 6.82 इंच स्क्रीन असलेला हा फोन तीन कलर्सच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स :-
अँड्रॉइड 10 आधारित XOS 6.2 वर कार्यरत असलेल्या इन्फिनिक्सच्या नवीन फोनमध्ये 6.82 इंच एचडी+ स्क्रीन असून ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो ए-25 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. रॅम 3 जीबी व इनबिल्ट स्टोरेज 32 जीबी आहे. तर, माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. हा स्मार्टफोन ड्युअल सिम कार्ड सपोर्ट करतो. फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर दिलं आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5 एमएम ऑडिओ जॅक, 4G व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, माइक्रो-युएसबी यांसारखे फीचर्स आहेत. याशिवाय DTS-HD सराउंड साउंड देखील आहे. तसेच फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये आहे. फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्यातील 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असून हा कॅमेरा ट्रिपल एलईडी फ्लॅश व डेप्थ सेन्सरला सपोर्ट करतो. तर, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत?:-
कंपनीने 7,999 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 12:14 pm

Web Title: infinix smart 4 plus first time goes on sale in india check price specifications and other details sas 89
Next Stories
1 Realme Narzo 10 स्मार्टफोनच्या खरेदीवर शानदार कॅशबॅक ऑफर, किंमत…
2 चार हजारांनी स्वस्त झाला ‘ड्युअल सेल्फी कॅमेरा’ असलेला शानदार स्मार्टफोन, कंपनीने केली किंमतीत कपात
3 48MP कॅमेऱ्यासह 5,020mAh क्षमतेची दमदार बॅटरी, Redmi Note 9 Pro चा आज ‘सेल’
Just Now!
X