Apple च्या नव्या iPhone ची प्रतीक्षा आता संपणार आहे. पुढील महिन्यात iPhones चे नवे व्हर्जन लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षीच्या सर्वात मोठ्या इव्हेंटसाठी कंपनीने मीडिया इन्व्हाईट पाठवण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हे इव्हेंट पार पडणार असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून iPhone 11 चे लॉन्च आणि त्याच्या फिचर्सबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. तसेच अपकमिंग आयफोनचे स्पेसिफिकेशन आणि त्याचे डिझाईनही लिक झाल्याची माहिती समोर आली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या इव्हेंटमध्ये कंपनी तीन नव्या आयफोन व्यतिरिक्त Apple Watch 4 चे अपग्रेडदेखील लॉन्च करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच कंपनी iPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR चा सक्सेसर (अपग्रेडेड व्हेरिअंट) लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रिपल कॅमेऱ्यासहित आयफोन?
गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी iPhone 11 सीरिजमध्ये काही नवे आयफोन लॉन्च करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यामध्ये iPhone 11 सोबतच iPhone 11 Max आणि iPhone XR लॉन्च करू शकतो. दरम्यान, फीचर्स म्हटले तर iPhone XS आणि iPhone XS मॅक्सच्या सक्सेसरमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर iPhone XR च्या अपग्रेडेड व्हेरिअंटमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

अन्य स्पेरिफिकेशन्स बाबत सांगायचे झाल्यास iPhone 11 सोबत A13 हा प्रोसेरस देण्यात येऊ शकतो. तसेच यापूर्वीच्या आयफोनच्या तुलनेत यातील बँटरीही अधिक असण्याची शक्यता आहे. तसेच नव्या फोनमध्येही OLED आणि LCD डिस्प्ले दिले जाण्याची शक्यता आहे.