प्रवाशांच्या हितासाठी IRCTC कायम नवनवीन संकल्पना राबवत असते. जास्तीत जास्त प्रवाशांनी रेल्वेद्वारे प्रवास करावा हा मुख्य हेतू यामागे असतो. नुकतीच कंपनीने आपली एक आकर्षक योजना जाहीर केली असून भक्तांना लवकरच त्याचा फायदा घेता येणार आहे. तिरुपती बालाजी हे देशभरातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. आता याठिकाणी जाण्यासाठी IRCTC एक खास टूर पॅकेज दिले आहे. यामध्ये विमानाच्या तिकीटापासून, राहण्याचा आणि जेवणाचा खर्च समाविष्ट असणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही ताण न घेता तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊ शकणार आहात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयआरसीटीसीने आपल्या या पॅकेडला Blissful Tirupati Special Ex Mumbai असे नाव दिले आहे. या यात्रेची सुरुवात २ फेब्रुवारीपासून करण्यात आली आहे. मार्च महिन्यात २,९,१६, २३ आणि ३० या तारखांना टूरचे आयोजन करण्यात आले आहे. हे पॅकेज २ दिवस आणि १ रात्र असेल असे सांगण्यात आले आहे. यामध्ये एकावेळी केवळ २४ जणांची सोय केली जाणार आहे. टूर पॅकेजमध्ये प्रवाशांसाठी मुंबई ते चेन्नई आणि चेन्नई ते मुंबई असे विमान तिकीट, एका वेळेचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि १२ सीटर बसमधून साइटसीइंग, यांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री राहण्यासाठी डिलक्स हॉटेलमध्ये व्यवस्था केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त होणारा खर्च प्रवाशांना स्वत:ला करायला लागेल. विमान तिकीटाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यास, एअरपोर्ट टॅक्स, फ्यूएल सरचार्ज, गाइड्स, ड्राइव्हर टिप्स इत्यादी सुविधांचा या पॅकेजमध्ये समावेश असणार आहे. आयआरसीटीसीने याबाबतची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. या पॅकेजमध्ये एका व्यक्तीसाठी १५,३५० रुपयांचे पॅकेज घ्यावे लागेल. तर दोन जणांसाठी प्रत्येकी १३,१०० रुपये आणि तीन लोकांसाठी १२,९५० रुपये द्यावे लागतील. यामध्ये ५ ते ११ वर्षांची मुले असतील तर त्यांच्यासाठी १२,७०० रुपये भरावे लागतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc introduces special tirupati balaji package for passengers
First published on: 20-02-2019 at 13:02 IST