News Flash

Jio च्या ‘ऑनलाइन गेमिंग टुर्नामेंट’ला होणार सुरूवात; बक्षीस 12.50 लाख रुपये, जाणून घ्या डिटेल्स

Jio युजर्सना 10 जानेवारीपर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन, जाणून घ्या डिटेल्स

आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) गेमिंग मास्टर्स ही एक ऑनलाइन गेमिंग टुर्नामेंट लाँच करण्याच्या तयारीत आहे. Jio कंपनी चिपसेट मेकिंग कंपनी MediaTek सोबत भागीदारीअंतर्गत गेमिंग टुर्नामेंट लाँच करेल. jio ची ही पहिलीच ऑनलाइन गेमिंग टुर्नामेंट असणार आहे.

१३ जानेवारी ते ७ मार्च दरम्यान म्हणजेच ७० दिवसांसाठी जिओची ही स्पर्धा असेल. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १२.५० लाख रुपयांचं वाटप बक्षीस म्हणून केलं जाईल. जिओच्या JioTV HD वर या स्पर्धेचं लाइव्ह प्रक्षेपण असेल.


कसं आणि कुठे करायचं रजिस्ट्रेशन :-
या ऑनलाइन गेमिंग टुर्नामेंटमध्ये Garena’s battle royal Game Free Fire या गेमला फिचर केलं जाईल. Free Fire हा ऑनलाइन गेम खेळण्यासाठी तुम्हाला स्वतःला रजिस्टर करावं लागेल. रजिस्ट्रेशनसाठी जिओ गेम प्लॅटफॉर्मवर (JioGames ) सुरूवात झाली आहे. १० जानेवारीपर्यंत युजर्स रजिस्ट्रेशन करु शकतात. फ्री फायर गेमिंग मास्टर ही स्पर्धा तीन टप्प्यामध्ये होणार असून ग्रँड फिनालेमध्ये २४ संघ सहभागी होतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 3:03 pm

Web Title: jio mediatek to launch gaming tournament prizes worth 12 5 lakh rupees can be won check how to register sas 89
Next Stories
1 2000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन, मिळेल पाच कॅमेऱ्यांसह 6GB रॅम + 5,000mAh बॅटरी
2 आता कारच्या पुढील दोन्ही सीटसाठी Air Bag देणं बंधनकारक? ‘या’ तारखेपासून लागू होऊ शकतो नवा नियम
3 Microsoft ने तब्बल 130 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतली Sony कंपनी? जाणून घ्या काय आहे सत्य?
Just Now!
X