बटन दाबताच तीन तासांचा चित्रपट एका क्षणात डाऊनलोड! हो आता हे लवकरच शक्य होणार आहे. वायफायचा इंटरनेट वेग हा तुम्हाला वेगवान वाटत असेल तर थांबा. थोडय़ा दिवसांत लायफायहे तंत्रज्ञान येत असून याद्वारे अवघ्या एका सेकंदात एक जीबी डेटा डाऊनलोड करता येणार आहे.

इंटरनेटचा वापर वाढला आहे. साहजिकच तो जितका जास्त वेगवान तितका वापरकर्त्यांला आनंद वाटतो. ऑनलाइन व्हिडीओ पाहायचा असो वा एखादा व्हिडीओ डाऊनलोड करायचा असो, वापरकर्त्यांना झटपट सगळय़ा गोष्टी हव्या असतात. सध्या बाजारात अगदी १०० एमबीपीएस या वेगाची इंटरनेट सुविधा पुरवण्यात येत आहे. याखेरीज वायफायच्या माध्यमातून ब्रॉडबॅण्ड इंटरनेटचा कमालीचा वेग उपलब्ध झाला आहे. मात्र, ‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून त्याचा वेग वायफायपेक्षा १०० पट अधिक असणार आहे.

What is tax harvesting and what to be careful about
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धती
Blood sugar control
बाजारात मिळणाऱ्या ब्रेड्सपैकी कोणते ब्रेड्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येईल? तज्ज्ञांचा सल्ला वाचा
Gas Stove vs Electric Stove
गॅस की इलेक्ट्रिक: कोणती शेगडी आहे चांगली? दोन्हीपैकी कोणती शेगडी वापरणे आहे फायदेशीर?

स्लो डाऊनलोडमुळे तमाम नेटिझन्स त्रस्त असतात. त्यावर पर्याय म्हणून ‘लायफाय’ विकसित झाले आहे. ‘वायफाय’ हे रेडिओ लहरींवर आधारित असते. या लहरींच्या माध्यमातून इंटरनेटचे चलनवलन होत असते. मात्र, ‘लायफाय’मध्ये प्रकाश लहरींच्या माध्यमातून इंटरनेट कार्यरत करण्यात येते. २०११ मध्ये स्कॉटलंडमधील एडिनबर्ग युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ हेरॉल्ड हास यांनी ‘लायफाय’चं संशोधन केलं आहे. वायर्डपेक्षा एलईडी प्रकाशाच्या माध्यमातून नेटवर्कचा वेग जास्त असतो, हे त्यांना आढळून आले आणि त्यानंतर यावर अधिक संशोधन करण्यात आले. आता हे तंत्रज्ञान अनेक देशांत रुजू लागले आहे. ‘लायफाय’ या तंत्रज्ञानाचा शोध २०११ पूर्वीच लागला होता. परंतु अपेक्षित वेग साध्य करता आला नाही. आताच्या ‘लायफाय’ तंत्रज्ञानात माहिती पाठविण्याचा वेग सेकंदाला १० गिगाबाइट्स इतका आहे.

वायफायच्या तुलनेत शंभरपट वेगवान असलेल्या ‘लायफाय’ तंत्रज्ञानाचा वापर सध्या रशिया, फ्रान्स, इस्तोनिका, इंग्लंड (यूके) या देशांमध्ये केला जात आहे. ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना लक्षात घेता, भारतात हे तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला जात आहे. ‘लायफाय’च्या माध्यमातून माणसाच्या डोळ्यांनाही चकवेल इतक्या वेगाने माहिती पाठवू शकता येते. वायफायच्या तुलनेत ‘लायफाय’चा आणखी एक फायदा असा, की यात संदेश हॅक करता येणार नाही. कारण प्रकाश हेच माहिती वहनाचे साधन असल्याने प्रकाश चोरणे हॅकर्सलाही शक्य नाही. कॉम्प्युटर, मोबाइल तसेच इंटरनेट कक्षेत येणाऱ्या प्रत्येक गॅझेटला हे तंत्रज्ञान साहाय्यभूत ठरणार आहे.

‘लायफाय’ या तंत्रज्ञानात एलईडी बल्बच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्यात येते. या बल्बमध्ये एक मायक्रोचिप बसवण्यात येते. ‘व्हिजिबल लाइट कम्युनिकेशन’ (व्हीएलसी) अर्थात ‘दृश्य प्रकाश वहन’या माध्यमातून ते काम करते. महत्त्वाचे म्हणजे बायनरी कोडमध्ये ट्रान्समिट होणारं हे तंत्रज्ञान आहे.

‘लायफाय’मुळे वायफाय नेटवर्कसंदर्भात जाणवणाऱ्या सुरक्षेच्या काही समस्या सुटू शकतात. उदा. : काही ठिकाणी अपरिहार्य कारणास्तव रेडिओ लहरींना मज्जाव असतो, अशा ठिकाणी प्रकाशाच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण शक्य आहे. शिवाय रेडिओ लहरी या भिंतीतून आरपार जाऊ  शकतात, पण प्रकाशाच्या लहरी या भिंतीला भेदू शकत नाहीत. तेव्हा वायफायप्रमाणे ‘लायफाय’ची रेंज ही भिंत ओलांडून पुढे न जाता चार भिंतीत हॅकर्सपासून सुरक्षित राहते. मोठी कार्यालये, रुग्णालयांसाठी तर हे तंत्र वरदानच ठरेल. येथे इंटरनेट सिग्नल्समध्ये बाधा कमी येतील. हे तंत्रज्ञान फारसे खर्चीक नसल्याचे संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे.

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी या संस्थेत साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)