News Flash

‘मारुती’ची नवी कार XL6 झाली लाँच, किंमत आणि खासियत

एसयूव्ही प्रकारातील इतर कारप्रमाणे या कारला 'बोल्ड' लूक देण्यात आलंय

Maruti Suzuki XL6 ही नवी कार भारतात लाँच झाली आहे. ही सहा आसनी प्रीमियम MPV (मल्टी पर्पज व्हेइकल) प्रकारातील कार असून केवळ पेट्रोल इंजिनसह ही कार भारतीय बाजारात उतरवण्यात आली आहे. कंपनीच्या सात आसनी Ertiga कारवर ही XL6 आधारीत आहे. XL6 ची विक्री Maruti Suzuki च्या प्रीमियम डीलरशिप नेक्साद्वारे होईल.

एसयूव्ही प्रकारातील इतर कारप्रमाणे या कारला बोल्ड लूक देण्यात आलं आहे. कंपनीच्या लेटेस्ट हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर या कारची निर्मिती करण्यात आलीये. यामध्ये नवीन क्वॉड-एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, नव्या आकाराचं बोनट आणि नवीन ग्रिल आहेत. मोठ्या ग्रिल आणि प्लास्टिक क्लॅडिंगसह नव्या डिझाइनच्या बंपरमुळे कार दिसायला असून आकर्षक दिसतेय. एक्सएल 6 मध्ये फ्लोटिंग रूफ, रूफ रेल्स आणि ब्लॅक अॅलॉय व्हिल्स असून मागील बाजूने ही कार Ertiga प्रमाणेच दिसते. मात्र, मागील ब्लॅक इंसर्ट्समुळे कारला मागील बाजूने थोडाफार स्पोर्टी लूक देखील आला आहे. सहा रंगांमध्ये ही कार उपलब्ध असणार आहे.

इंटेरिअर – फीचर्स
एक्सएल6 एमपीव्हीतील कॅबिन काळ्या रंगात असून डॅश बोर्डवर प्रीमियम स्टोन फिनिशींग आहे. स्टिअरींग व्हिलवर लेदर फिनिशिंग आहे. या कारमध्ये नवीन स्मार्टप्ले स्टुडिओ इंफोटेनमेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एयरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स, रिअर पार्किंग सेंसर्स, सीट बेल्ट रिमाइंडर आणि हायस्पीड वॉर्निंग अलर्ट यांसारखे फीचर्स सर्व व्हेरिअंटमध्ये आहेत. ऑटोमॅटिक व्हेरिअंटमध्ये हिल होल्ड फंक्शनसह इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP) देखील आहे.

इंजिन –
मारुति एक्सएल6 मध्ये 1.5-लिटर स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 103hp ची ऊर्जा आणि 138Nm पीक टॉर्क निर्माण करतं. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय आहेत. बीएस-6 मानकांनुसार हे इंजिन आहे.

व्हेरिअंट आणि किंमत –
मारुति एक्सएल6 ही कार Zeta आणि Alpha या दोन व्हेरिअंट्ससह बाजारात उतरवण्यात आली असून मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या आधारे चार पर्याय उपलब्ध आहेत. Zeta-मॅन्युअल गिअरबॉक्सची किंमत 9 लाख 79 हजार 689 रुपये आणि ऑटोमॅटिकची किंमत 10 लाख 89 हजार 689 रुपये आहे. दोन्ही एक्स-शोरुम किंमती आहेत. तर, Alpha-मॅन्युअल गिअरबॉक्सची किंमत 10 लाख 36 हजार 189 रुपये आणि ऑटोमॅटिकची किंमत 11 लाख 46 हजार 189 रुपये आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 11:50 am

Web Title: maruti suzuki xl6 launched know price and all specifications sas 89
Next Stories
1 साप चावल्यानंतर टाळा ‘या’ गोष्टी !
2 अॅसिडीटीपासून त्वचेच्या विकारांसाठी उपयोगी आहे पिंपळाचं झाड, जाणून घ्या फायदे
3 इंटरनेट प्लॅन लगेच संपतोय? मोबाइल डेटाची बचत करण्यासाठी ‘हे’ कराच
Just Now!
X