चुंबकीय सस्पंदन प्रतिमा पद्धतीने (एमआरआय) मुलांच्या बुद्धिमत्तेची पातळी तपासता येते, असे एका संशोधनात दिसून आले. शरीराच्या अंतर्गत भागांच्या व उतींच्या प्रतिमाचित्रणासाठी एमआरआयचा वापर केला जातो पण त्याचा उपयोग बुद्धिमत्तेची पातळी तपासता येईल, असे रशियातील स्कोलकोव्हो इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. सखोल अध्ययनाच्या त्रिमितीय रचनांचा उपयोग मेंदूच्या एमआरआय प्रतिमा घेऊन बुद्धिमत्तेचा स्तर ठरवण्यासाठी केला जाऊ शकतो.

अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ या संस्थेच्या माहितीसंचातील अकरा हजार रचनात्मक व कार्यात्मक एमआरआय प्रतिमांचा वापर यात संदर्भासाठी करण्यात आला. ९ ते १० वयोगटातील मुलांच्या मेंदूच्या या प्रतिमा आहेत. हे संशोधन अॅतडोलसंट ब्रेन कॉगनिटिव्ह डेव्हलपमेंट न्यूरोकॉगनिटिव्ह प्रेडिक्षन या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे त्यात बुद्धिमत्ता स्तर तपासणीवर भर देण्यात आला होता. तरल बुद्धिमत्ता पातळी यात तपासणे शक्य होते असे दिसून आले. तरल बुद्धिमत्तेत तर्कसंगत विचार, अपवादात्मक स्थितीत काही प्रश्न सोडवण्याची क्षमता. स्वतंत्र ज्ञान यांचा विचार केला जातो.

नवीन पद्धतीच्या मदतीने तरल बुद्धिमत्तेबाबत अंदाज करतानाच मेंदूचा आकार, लिंग, वय व एमआरआय स्कॅनरचा प्रकार हे घटक महत्त्वाचे आहेत. या मेंदूच्या चेतापेशींच्या जाळ्याच्या अधिक अचूक त्रिमिती प्रतिमा घेतल्या जातात. त्यातून मुलांची तरल बुद्धिमत्ता व मेंदूची रचना यांचा संबंध लावून दाखवता येतो, असा दावा एकॅटेरिना कोंड्रातयेवा यांनी केला आहे. यात अंदाजाची अचूकता कमी असली तरी त्यातून आकलन, सामाजिक, भावनिक, शारीरिक विकास यावर प्रकाश पडू शकतो.