WhatsApp युजर्सना दिलासा देणारं वृत्त आहे. व्हॉटस अ‍ॅप ग्रुपमध्ये कोणालाही अ‍ॅड करायचे असल्यास त्या व्यक्तीची परवानगी असणे आता गरजेचे होणार आहे, जर तुमची परवानगी नसेल तर कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. तशी सूचना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) व्हॉट्स अॅपला केली आहे. कोणालाही अॅड करण्यासाठी त्याची परवानगी घेणारं फिचर आणावं अशी सूचना करण्यात आली आहे.

सध्या कोणालाही कोणत्याही ग्रुपमध्ये त्याच्या परवानगीशिवाय अॅड केलं जातं. अनेकांकडून विनापरवानगी कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड केल्याच्या तक्रारी आल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. या सर्व तक्रारींची माहिती सरकारी संस्थांनी केंद्र सरकारला दिल्यानंतर मंत्रालयाने व्हॉट्स अॅपला अशाप्रकारचं फिचर आणण्याची सूचना केली आहे.

Central Bureau of Investigation Bharti various vacant posts of Consultants job location is Mumbai
CBI Bharti 2024 : सल्लागार पदासाठी सीबीआयमध्ये पदभरती; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख
tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष

व्हॉट्स अॅपने ग्रुप अॅडमिनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये युजरचा नंबर असणं आवश्यक असावं आणि जर एखाद्या युजरने कोणता ग्रुप दोनवेळेस सोडला तर अॅडमिन त्याला पुन्हा अॅड करु शकत नाही असं एक फिचर यापूर्वी आणलं होतं. मात्र हे फिचर परिणामकारक ठरलं नाही. मंत्रालयाने व्हॉट्स अॅपला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, ‘काही युजर्सना एखादा ग्रुप दोन वेळेस सोडल्यावरही दुसऱ्या अॅडमिनद्वारे ग्रुपमध्ये अॅड करण्यात आलं. काही प्रकरणांमध्ये दुसऱ्या मोबाइल क्रमांकाद्वारे ग्रुप बनवण्यात आला आणि यामध्ये युजर्सना अॅड करण्यात आलं’. अद्याप व्हॉट्स अॅपने मंत्रालयाच्या पत्राला उत्तर दिलेलं नाहीये. मात्र, केंद्र सरकारकडून सूचना मिळाल्याने लवकरच व्हॉट्स अॅप अशाप्रकारचं एक नवं फिचर आणण्याची शक्यता आहे.