News Flash

नोकियाच्या चाहत्यांसाठी खूशखबर! १५ ऑगस्टपासून उपलब्ध होणार ‘नोकिया ५’

या फोनची किंमत १*, ***/-

'नोकीया' ५ हा १५ ऑगस्टापासून भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

नोकियाच्या बहुप्रतिक्षित अशा स्मार्टफोनपैकी एक असलेला ‘नोकिया’ ५ हा १५ ऑगस्टापासून भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जूनमध्ये नोकियाचे तिन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले होते. त्यानंतर जुलैपासून या फोनची ऑनलाइन बुकिंग सुरू झाली. हे फोन आधी ई-कॉमर्स साईटवर उपलब्ध होते आता मात्र ग्राहकांना ऑफलाइन म्हणजे जवळच्या मोबाईल स्टोअरमध्ये १५ ऑगस्टपासून  हे फोन विकत घेता येणार आहे.

एचएमडी ग्लोबलनं या संदर्भातली माहिती दिली आहे. या फोनची किंमत १२, ४९९ रुपये असणार आहे. हा फोन चार रंगात उपलब्ध असणार आहे. मॅट ब्लॅक, सिल्व्हर, टेम्परर्ड ब्लू, कॉपर अशा चार रंगात हे फोन ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. पण सध्या बाजारात मात्र मॅट ब्लक रंगाचाच हँडसेट उपलब्ध असणार आहे. उर्वरित तीन रंगासाठी मात्र ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे.  ५.२ इंचाचा डिस्प्ले, मेटल युनिबॉडी डिझाईन, क्वॉलकोम स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर, २ जीबी रॅम, १६ जीबी स्टोअरेज, १३ मेगा पिक्सेल कॅमेरा ८ मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा असं या फोनचं वैशिष्ट्ये असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 2:12 pm

Web Title: nokia 5 will be available for sale in offline retail in india from august 15
Next Stories
1 ‘ही’ अनोखी स्कूटर लवकरच होणार भारतात दाखल
2 …म्हणून साजरी केली जाते गोकुळाष्टमी
3 नकारात्मक भावना दाबून टाकल्याने हानी अधिक
Just Now!
X