News Flash

दहावी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी, परिक्षाही नाही

मंदीत संधी

करोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. भारतासह जगभरात मंदीचं वातावरण आहे. या बिकट परिस्थितीमध्ये अनेंकाच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका, रेल्वे खाते यांनी बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. भारतीय रेल्वेमार्फत ४ हजार ४९९ विविध पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठीची जाहिरात रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भरती विना परिक्षा केली जाणार आहे.

उमेदवारांची निवड दहावीवीच्या गुणांच्या आधारे केली करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा होणार नाह. ऑनलाईन अर्जाची सुरूवात १६ ऑगस्ट २०२० झाली असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२० आहे. या भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची १० वी परिक्षा उत्तीर्ण केलेली असा. तसेच कमीतकमी ५० टक्के गुण असावेत. त्याशिवाय उमेदवार आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असावा.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष यादरम्यान असावे. आरक्षणासाठी नियमांप्रमाणे वयामध्ये सूट दिली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या एससी/एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. अन्य वर्गांसाठी १०० रुपये शुल्क आकारले जाईल.

 

आधिक माहितीसाठी जाहिरात पाहा – त्यासाठी इथं क्लिक करा

एनएफआर आरआरसी रिक्रुटमेंट २०२० साठी अर्ज करण्याची ही http://rrcnfr.co.in लिंक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2020 10:48 am

Web Title: northeast frontier railway recruitment 2020 apply for 4499 apprentice posts on nfr indianrailways gov in nck 90
टॅग : Job
Next Stories
1 64MP कॅमेरा : ‘शाओमी’चा शानदार स्मार्टफोन खरेदीची आज संधी, जाणून घ्या डिटेल्स
2 तब्बल 6000mAh ची बॅटरी; रिअलमीने लाँच केले दोन दमदार ‘बजेट’ स्मार्टफोन, किंमत फक्त…
3 रिलायन्सने ई-फार्मसी कंपनी Netmeds मध्ये खरेदी केला मोठा हिस्सा, जाणून घ्या कितीमध्ये झाला करार?
Just Now!
X