26 February 2021

News Flash

World Sleep Day : अपुरी झोप तुम्हालाही सतावतीये?

अनेक जण करतात समस्येचा सामना

प्रातिनिधिक छायाचित्र

रात्री झोप पूर्ण होणे उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. व्यक्तीनुसार झोपेची गरज बदलत असली तरीही किमान ७ ते ८ तासांची झोप प्रत्येकाला आवश्यक असतेच. हल्ली वाढती स्पर्धा आणि मोबाईल, लॅपटॉप यांचे व्यसन यामुळे झोपण्याच्या वेळा बदलल्या आहेत. अनेक जण रात्री जागरण करुन उशीरा झोपतात आणि सकाळीही कसेबसे उठतात. पण रात्री वेळेत झोपून आणि पुरेशी झोप होऊनही अनेकांना ताजेतवाने वाटत नाही. असे लोक दिवसभर जांभई देत राहतात किंवा त्यांच्यातील आळस आपल्याला दिसून येतो. आता असे होण्यामागे नेमके काय कारण असू शकते. तर अशा लोकांना अगदी लहान सहान गोष्टींवरुनही राग येतो. तसेच त्यांना स्लीप सिंड्रोम, स्लीप अॅप्निया किंवा स्लिपींग डिसऑर्डर असू शकते.

– नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार केवळ २७ टक्के लोक सामान्यपणे ७ ते ८ तास झोप घेतात. तर ६ ते ७ झोप घेणाऱ्या लोकांचे प्रमाणही २७ टक्केच आहे.

– ५ ते ६ तास झोपणाऱ्या लोकांचे प्रमाणही जास्त आहे. ३२ टक्के लोक इतका कमी वेळ झोपतात. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.

– १४ टक्के लोक केवळ ४ ते ५ तास झोपतात. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक उद्भवतात.

– एकूण ९३ टक्के लोक झोप न येण्याच्या तक्रारीने हैराण असतात. तर ५८ टक्के लोकांच्या दैनंदिन जीवनावर याचा खूप परिणाम होतो.

– जगात केवळ ५ टक्के लोक आहेत जे रात्री ९.३० वाजता झोपतात. तर रात्री १० वाजता झोपणाऱ्यांचे प्रमाण १८ टक्के आहे. तर १०.३० वाजता ९ टक्के लोक झोपतात.

– रात्री ११ वाजता झोपणाऱ्यांचे प्रमाण ३२ टक्के आहे. यानंतर म्हणजेच ११.३० आणि १२ वाजता झोपणाऱ्यांचे प्रमाण ५ टक्के इतके आहे. तर १ वाजता झोपणाऱ्यांचे प्रमाण जास्त म्हणजेच १८ टक्के आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 10:00 am

Web Title: not getting sound sleep you may have some health problems statistics
Next Stories
1 जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्व!
2 नववर्षांचा सृष्टिसंकेत
3 खरेदीची गुढी
Just Now!
X