News Flash

OnePlus Nord : 499 रुपयांत प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात, होईल ₹5000 पर्यंतचा फायदाही

OnePlus च्या सर्वात ‘स्वस्त’ फोनसाठी आजपासून प्री-बुकिंग

OnePlus Nord हा वन प्लस कंपनीचा ‘स्वस्त’ स्मार्टफोन 21 जुलै रोजी लाँच होणार असून आज  (दि.15) दुपारी दीड वाजेपासून या फोनसाठी प्री-ऑर्डर बुकिंग सुरू झाली आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर 499 रुपयांमध्ये या फोनसाठी प्री-बुकिंग करता येईल. याबदल्यात कंपनीकडून ग्राहकांना एक खास गिफ्ट बॉक्स दिला जाईल. नवीन वनप्लस नॉर्ड हा “अ‍ॅफॉर्डेबल प्राइस सेगमेंट”मधला OnePlus चा पहिला फोन असेल.

गेल्या अनेक दिवसांपासून वनप्लसचा हा फोन चर्चेत आहे. कारण या फोनसोबत कंपनी अनेक दिवसांनंतर मिड-रेंज सेगमेंटमध्ये पुनरागमन करणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये OnePlus ने किंमतीपेक्षा अनोख्या फीचर्सवर जास्त लक्ष दिलं होतं. 21 जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता एका इव्हेंटमध्ये हा फोन लाँच केला जाईल. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांनी हा फोन 31 ऑगस्टपर्यंत खरेदी केल्यास त्यांना कंपनीकडून एक गिफ्ट बॉक्स दिला जाईल. त्यामध्ये OnePlus Bullets Wireless V1 हेडफोन्ससह एक फोन कव्हर मोफत मिळेल. याशिवाय फोनसाठी प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 5000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स दिले जातील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

आतापर्यंत आलेल्या टीझर्सनुसार OnePlus Nord तीन रिअर कॅमेरे असलेला फोन असेल हे स्पष्ट झालंय. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765 प्रोसेसर आणि दोन सेल्फी कॅमेरे असतील. याव्यतिरिक्त फोनच्या अन्य फीचर्सबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. वनप्लस नॉर्ड हा कंपनीचा आतापर्यंतचा स्वस्त स्मार्टफोन असेल अशी चर्चा आहे. या फोनची किंमत 500 डॉलरपेक्षा कमी (जवळपास 37,700 रुपये) असेल. म्हणजे नवीन वनप्लस फोन OnePlus 8 सीरिजच्या तुलनेत स्वस्त असणार आहे. OnePlus 8 सीरिजच्या बेसिक मॉडेलची किंमत 699 डॉलर म्हणजे भारतात 41,999 रुपयांपासून सुरू होते. तर, नव्या वनप्लस फोनची किंमत 25 ते 37 हजारादरम्यान असू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 1:47 pm

Web Title: oneplus nord pre orders open in india via amazon at rs 499 get details sas 89
Next Stories
1 स्टेट बँकेत ‘या’ पदांसाठी मोठी भरती; अर्ज करण्यासाठी राहिले अखेरचे तीन दिवस
2 ‘मारुती’ने परत मागवल्या 1 लाख 34 हजारांहून जास्त कार, चेक करा तुमची गाडी आहे की नाही?
3 ‘अ‍ॅपल’ने Samsung ला दिली तब्बल ₹7100 कोटींची भरपाई, ‘हे’ आहे कारण
Just Now!
X