News Flash

‘बजेट’ स्मार्टफोन Redmi Note 10 चा आज पहिलाच Sale, काय आहे खासियत?

5000mAhबॅटरी, सुपर AMOLED डिस्प्लेसोबतच कमी किंमतीत दमदार क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप...

(PC: Shruti Dhapola/Indian Express)

शाओमी कंपनीने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आपल्या लेटेस्ट स्मार्टफोनसाठी नवीन Redmi Note 10 सीरिज भारतात लाँच केली. कंपनीने Redmi Note 10 सीरिजअंतर्गत तीन स्मार्टफोन लाँच केलेत. यात रेडमी नोट 10 (Redmi Note 10), रेडमी नोट 10 प्रो (Redmi Note 10 Pro) आणि रेडमी नोट 10 प्रो मॅक्स (Redmi Note 10 Pro Max) हे तीन स्मार्टफोन कंपनीने आणले आहेत. या फोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही फोनमध्ये सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, शिवाय कमी किंमतीत दमदार क्वॉड रिअर कॅमेरा सेटअपही मिळतो. यातील Redmi Note 10 हा स्मार्टफोन आज पहिल्यांदाच सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. दुपारी १२ वाजेपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर (mi.com) किंवा अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर पहिल्या सेलला सुरूवात होईल.

Redmi Note 10 स्पेसिफिकेशन्स :-

Redmi Note 10 मध्ये अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12 चा सपोर्ट असून फोनमध्ये 6.43 इंच फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनही मिळेल.  फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 678 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Adreno 612 GPU आहे. यात 6GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील प्रायमरी 48 मेगापिक्सेल सोनी IMX582 सेन्सर, दुसरा 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल, तिसरा 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आणि चौथा 2 मेगापिक्सेल डेफ्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, IR, USB टाइप-सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळतो. फोनमध्ये सेल्फ क्लिनिंग स्पीकर आहे. शिवाय Redmi Note 10 मध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली5000mAh ची बॅटरी मिळते. चार्जर फोनसोबत बॉक्समध्येच मिळेल.

Redmi Note 10ची किंमत :-

Redmi Note 10 ची बेसिक किंमत 11 हजार 999 रुपये आहे. ही किंमत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची आहे, तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. हा फोन अ‍ॅक्वा ग्रीन, फ्रोस्ट व्हाइट आणि शॅडो ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायात उपलब्ध असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 11:04 am

Web Title: redmi note 10 goes on first sale today in india check price specifications features availability and more sas 89
Next Stories
1 Reliance Jio : 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ऑफर्स
2 24 मार्चला लाँच होणार Realme 8 सीरिज, मिळेल तब्बल 108MP क्षमतेचा कॅमेरा
3 किंमत 10,999 रुपये; 64MP कॅमेरा+5000mAh, ‘मोटो’च्या स्वस्त फोनचा ‘या’ तारखेला पहिला सेल
Just Now!
X