News Flash

Redmi Note 10 Pro Max : स्वस्तात 108MP कॅमेऱ्याचा दमदार स्मार्टफोन खरेदीची संधी

108MP क्षमतेचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असलेल्यांसाठी चांगली संधी

(Photo credit: Saurabh Singh/Financial Express)

108MP क्षमतेचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर चांगली संधी आहे. कारण, Redmi Note 10 Pro Max हा शाओमी कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन आज(दि.८) पुन्हा एकदा फ्लॅश सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. दुपारी १२ वाजेपासून ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर (mi.com) Redmi Note 10 Pro Max साठी सेलला सुरूवात झालीये. सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही शानदार ऑफर्सही आहेत. सेलमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना 1500 रुपये फ्लॅट डिस्काउंट मिळेल. याशिवाय फोन खरेदी करणाऱ्या जिओ यूजर्सना 349 रुपयांच्या प्लॅनवर 3 हजार रुपये कॅशबॅकची ऑफरही आहे. जाणून घेऊया Redmi Note 10 Pro Max ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स :-

Redmi Note 10 Pro Max की स्पेसिफिकेशन्स :-

Redmi Note 10 Pro Max मध्ये अँड्रॉयड 11 वर आधारित MIUI 12 सपोर्ट असून 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर  गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Adreno 618 GPU, 8 जीबीपर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. यात क्वॉड रिअर कॅमेरा  (108 मेगापिक्सेल सॅमसंग HM2 सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड, 5 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल  डेफ्थ सेन्सर) सेटअप आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्येही 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. कॅमेऱ्यासोबत नाइट मोड 2.0, VLOG मोड, मॅजिक क्लोन मोड, लॉन्ग एक्स्पोजर, व्हिडिओ प्रो मोड आणि ड्युअल व्हिडिओ मोड मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS/A-GPS, (IR), USB टाइप सी आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5020mAh क्षमतेची बॅटरी मिळेल, शिवाय चार्जर फोनसोबत बॉक्समध्येच मिळेल.

Redmi Note 10 Pro Max  किंमत किती?:-

Redmi Note 10 Pro Max च्या 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 18 हजार 999 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजची किंमत 21 हजार 999 रुपये आहे. हा फोन डार्क नाइट, ग्लेशियर ब्लू आणि व्हिंटेज ब्राँझ अशा तीन रंगात खरेदी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:42 pm

Web Title: redmi note 10 pro max with 108 mp with 108mp quad rear camera setup check price specifications sas 89
Next Stories
1 अजून स्वस्त झाला Samsung Galaxy A31, कंपनीने केली किंमतीत कपात
2 JioFiber ची भन्नाट ऑफर, ‘या’ प्लॅनमध्ये एक महिना एक्स्ट्रा व्हॅलिडिटी
3 20 हजारांहून कमी किंमतीत आला OPPO F19, मिळेल 48MP कॅमेरा + 5000mAh बॅटरी
Just Now!
X